शिक्षक संघाच्या या मागणीला प्रांताधिकारी शिंगटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा शिक्षकांचे निवडणूक आदेश रद्द करण्याची सूचना संबंधित तहसीलदारांना देण्यात येतील असे सांगितले. यावेळी विनायक शिंदे, अविनाश गुरव, पोपट सूर्यवंशी, बाजीराव पाटील, सलीम मुल्ला, नितीन चव्हाण, शब्बीर तांबोळी, समाधान ऐवळे, बाळासो खेडकर, मौलाली शेख यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोट :
निवडणूक कामामुळे शिक्षकांना टपाली मतदान करावे लागणार आहे. अनेक गावात एखाद्याच शिक्षकाचे टपाली मतदान होत असल्यामुळे मतदान गुप्त राहण्यास मर्यादा येत असतात. त्यामुळे त्या शिक्षकाला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या शिक्षकांचे टपाली मतदानाऐवजी मतपेटीतून मतदान करावे किंवा मतदान करण्यासाठी वेळेत शिथिलता द्यावी, अशी मागणी केली आहे.
अविनाश गुरव, संचालक शिक्षक बँक.