शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची शिवभोजन थाळी सामान्यांसाठीची आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST

इस्लामपूर येथील पंगत डायनिंगमधील शिवभोजन केंद्रास उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. रणजित शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. ...

इस्लामपूर येथील पंगत डायनिंगमधील शिवभोजन केंद्रास उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. रणजित शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, आनंदराव पवार, शकील सय्यद उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेला मिळत असणाऱ्या शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद हा सरकारसाठी दुुवा ठरेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी ही योजना लॉकडाऊन काळात सामान्यांना आधार ठरली आहे, असा विश्वास उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

अन्न दिनाचे औचित्य साधत उदय सामंत यांनी येथील प्रशासकीय इमारतीशेजारी पंगत डायनिंगमधील शिवभोजन केंद्राला भेट दिली. याठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांचा शिवभोजन थाळीविषयी प्रतिसाद जाणून घेतला. केंद्रचालक रणजित शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

शिंदे यांनी या केंद्रातून शिवभोजन थाळीसह गरजूंना घरपोच जेवण व्यवस्था, बंदोबस्तावरील पोलीस, रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या चालकांनासुद्धा जेवण उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, जिल्हा पुरवठा अधिकारी बारवे, तालुका पुरवठा निरीक्षक बबन करे, केंद्राच्या संचालिका अलका शिंदे, सागर मलगुंडे, सुलाबाई साळुंखे उपस्थित होत्या.