शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा संस्थांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: October 18, 2016 00:50 IST

सांगलीत बैठक : एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मोर्चा काढण्याचा बैठकीत निर्णय

सांगली : जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या प्रश्नांकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. आठ महिन्यांपूर्वी वीजदर वाढीत कपात करण्याचा निर्णय झाला; पण अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. शासनाच्या भूमिकेविरोधात जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे. लवकरच पाणीपुरवठा संस्थांच्या विविध प्रश्नांबाबत मोर्चा काढण्याचा निर्धार सोमवारी सांगलीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. सांगली जिल्हा सहकारी पाणीपुरवठा संस्था संघ (इरिगेशन फेडरेशन)ची बैठक येथील कामगार भवनमध्ये पार पडली. या बैठकीला क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, फेडरेशनचे उपाध्यक्ष जे. पी. लाड, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील, आर. जी. तांबे यांच्यासह पाणीपुरवठा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. आर. जी. तांबे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील फेडरेशनच्या कामाची माहिती दिली. अरुण लाड म्हणाले की, पाणीपुरवठा संस्थांचे सचिव, संचालकांची एकजूट नसल्याने आपली ताकद शासनापर्यंत पोहोचत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सध्या शासनाकडून पाणीपुरवठा संस्थांच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आठ महिन्यांपूर्वी वीज दरवाढीत कपात करण्याचे पत्र दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले; पण अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे २४ पैसे थकबाकी असलेल्या संस्थांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. उन्हाळ्यात कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली होती, पण त्यालाही शासनाने दाद दिली नाही. अखेर आपण एकत्र येऊन मोर्चा काढल्यानंतर शासनाला जाग आली. ठिबक योजनेच्या अनुदानाबाबत शासनस्तरावर उदासीनता आहे. अजून कित्येक संस्थांना अनुदान दिलेले नाही. अ‍ॅड. अजित सूर्यवंशी म्हणाले की, फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यावे. त्याशिवाय मागण्यांचा विचार शासनस्तरावर होणार नाही. बैठकीत प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठा संस्थांच्यावतीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)फेडरेशनच्या मागण्याशेतीपंपाला मीटर बसावावे, किमान पाच वर्षे वीज व पाणीपट्टी मर्यादित ठेवावी, सहा महिन्याला वीजदर वाढ करू नये, जून २०१५ मध्ये २४ पैसे वीज दरवाढ रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, पाटबंधारे खात्याने पोकळ व दंडीत आकारणी करू नये, इंधन अधिभार रद्द करावा.