शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांसाठी सरकारचा वेळकाढूपणा

By admin | Updated: April 22, 2016 00:44 IST

विक्रम सावंत : भाजपकडून दुष्काळाचे राजकारण; जत तालुक्यावर अन्याय

जत : मागेल तेथे आवश्यकतेनुसार चारा छावणी दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत तालुका दौऱ्यात दिले होते. परंतु त्याची पूर्तता त्यांनी केली नाही. चारा छावणी सुरू करण्यासाठी शासनाने बारा जाचक अटी घालून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे, असा आरोप जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला. तालुक्यात भयानक चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. शासन दुष्काळातही राजकारण करत आहे. नगर व सोलापूर जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील सर्वच गावात टंचाई जाहीर केली आहे. परंतु जत तालुक्यातील ५२ गावांसाठी सवलतीची घोषणा केली नाही. आमदार विलासराव जगताप यासंदर्भात काहीच बोलत नाहीत. चारा व पाणी टंचाईसंदर्भात प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या उपाययोजनेकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील जनतेला कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. असे सांगून विक्रम सावंत पुढे म्हणाले की, चारा छावणीसंदर्भात शासनाने कोणतीही जाहिरात केली नाही किंवा ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयातील नोटीस बोर्डावर माहिती प्रसिध्द केली नाही. त्यामुळे पशुधन मालक अनभिज्ञ आहेत. माडग्याळ, जाडरबोबलाद व व्हसपेठ वगळता तालुक्यातील इतर गावातील अर्ज मिळाले नाहीत. तलाठी, ग्रामसेवक नेमणूक असलेल्या गावात रहात नाहीत. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. जत तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी खरीप हंगामातील ५२ गावांचा दौरा करून तेथील जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना चारा छावणी सुरू करण्याचे अर्ज दिले आहेत. गुरुवारी सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चारा छावणी सुरू करण्यासाठी अर्ज भरून दिले आहेत. २०१३ मध्ये आघाडी शासनाने खरीप, रब्बी असा दुजाभाव केला नाही. सर्वच गावात टंचाई जाहीर करून सवलती दिल्या होत्या. शासन प्रतिमाणसी विस लिटर पाणी देत आहे. यामध्ये जनावरांच्या पाण्याचा समावेश केला नाही. त्यात जनावरांच्या पाण्याचा समावेश करून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली. शासन आता चारा छावणी मागणीचे अर्ज घेऊन त्यांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर छावणी सुरू होणार आहे. यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. फक्त कागदी घोडे नाचवून शासन छावणी सुरू करण्याचा फार्स करणार आहे. छावणी सुरू होईल का नाही, ते सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.बाजार समिती सभापती संतोष पाटील, जतचे सभापती देवगोंडा बिरादार, पिराप्पा माळी, आप्पा बिराजदार, रवींद्र सावंत, मोहन कुलकर्णी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)