शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलासाठी सरकारने पाणी योजना बंद पाडल्या

By admin | Updated: January 10, 2017 23:08 IST

शशिकांत शिंदे : सावळजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा

तासगाव : आमचे सरकार असताना सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना टंचाई निधीतून पाणी योजनांची वीजबिले, पाणीपट्टी भरुन पाणी दिले. परंतु भाजप सरकारला तेवढेही जमत नाही. त्यांनी आबांच्या काळात झालेल्या विसापूर, पुणदी, आरफळ, म्हैसाळ योजना वीज बिलासाठी बंद पाडल्या, अशी टीका माजी जलसंपदामंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. या योजना शेतकऱ्यांकडून पैसे न घेता चालू करुन दाखवाव्यात, असे आव्हानही त्यांनी सावळज (ता. तासगाव) येथे दिले. सावळज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शेतकरी मेळावा झाला. आमदार सुमनताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी आमदार शिंदे म्हणाले, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील पाणी योजना सुरू करण्यासाठी कधीही शेतकऱ्यांकडे पैशासाठी तगादा लावत नव्हते. याउलट शासन दरबारी पाठपुरावा करून शासनाच्या निधीतून पाणी योजना सुुरू ठेवण्यास भाग पाडत होते. आताचे हुकूमशहा सरकार मात्र वीजबिल, पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी सोडत नाही. नोटाबंदीमुळे सामान्य जनता वैतागली आहे. येथील शेतीला पाणी नाही, शेतीमालाला दर नाही, तरुणांना नोकरी नाही, गुन्हेगारी वाढत आहे, अशी अवस्था भाजप सरकारची आहे. मात्र आम्ही तुम्हाला पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तीव्र आंदोलन करुन या भागाला पाणी मिळवून देऊ.माजी सभापती चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप सरकार मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ करते, मात्र शेतकऱ्यांना वीजबिल, कर्जमाफी देत नाही. बिलासाठी पाणी योजना बंद ठेवल्या जातात. राजकीय अडथळे आणून तालुक्यातील एमआयडीसी नामंजूर करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्रेहल पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, दीपक उनउने, राजू सावंत, वसंत सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)