शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

वस्त्रोद्योगाबाबत शासन उदासीन

By admin | Updated: September 13, 2015 22:51 IST

जयंत पाटील : शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची सभा

इस्लामपूर : राज्यातील युती शासनाची वस्त्रोद्योगाला मदत करण्याची भूमिका नाही. वीज दरवाढीची बिकट समस्या निर्माण झाल्याने वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे. रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची मोठी क्षमता असणाऱ्या वस्त्रोद्योगाबाबत सरकारकडून लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केली.राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलातील शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची १३ वी वार्षिक सभा झाली. यावेळी आ. पाटील बोलत होते. बबन थोटे अध्यक्षस्थानी होते. संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील, ज्येष्ठ नेते रामराव देशमुख, प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श कामगार व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. संचालक रघुनाथ मदने यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.आमदार जयंत पाटील म्हणाले, बाजारात सध्या मंदी आहे. सूत, कापडाला उठाव नाही. वस्त्रोद्योगापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशावेळी शेतकरी-विणकरी सूतगिरणीने आपल्या यंत्रसामग्रीची कार्यक्षमता वाढवून या अडचणीच्या काळातही मार्गक्रमण करावे.संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, विजेची दरवाढ, कापूस खरेदी-विक्री नियंत्रणाबाहेर गेली आणि बाजारात सुताला दर नाही, अशा अडचणीत सापडलेल्या सूतगिरण्यांबाबत शासनाने मदतीचे धोरण अवलंबले नाही, तर येत्या दोन महिन्यात राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याचा धोका आहे. शेतकरी विणकरी सूतगिरणीने अनेक संकटांवर मात करीत आपला लौकिक कायम ठेवला आहे. सूत उत्पादनासह मूल्यवर्धित प्रकल्पांची उभारणी केली आहे. शासनाने सूत निर्यातीस परवानगी देऊन प्रतिकिलो १० रुपये अनुदान द्यावे. वीजदरात कपात करावी. व्हॅट कराचा कोट्यवधींचा परतावा द्यावा, या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.सूतगिरणीचे अध्यक्ष बबन थोटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विजयकुमार घारगे, महादेव दानवरे यांना ‘आदर्श कामगार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. वेदांतिका शिंदे, हिमांशू मोरे, सुमित चव्हाण, अथर्व शिंदे, श्रावणी पाटील, सुमित पाटील या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालिका रोजा किणीकर यांनी आदरांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मुख्य लेखापाल एच. बी. मुलाणी यांनी आर्थिक ताळेबंदाचे वाचन केले.इस्लामपूर शहर वाय-फाय केल्याबद्दल आ. जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी मांडला. मोहन आडके यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका कमल पाटील यांनी आभार मानले.सभेला बशीर मोमीन, दिलीप वग्याणी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, युवराज सूर्यवंशी, धनाजी पाटील, एम. एम. पाटील, अण्णा तगारे यांच्यासह सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)