शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शासन, साखर कारखानदारांकडून फसवणूक : रघुनाथ पाटील

By admin | Updated: January 16, 2015 23:42 IST

सर्व शेतकरी, संघटना ‘शेतकरी संघर्ष समितीच्या’ झेंड्याखाली एकत्रित आणण्याचा प्रयत्न असून

अंकलखोप : शेतकरी वर्गाला सरकार व कारखानदार फसवत असून एफआरपीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या उसाला, कवडीमोल किंमत देण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडावा व आपल्या उसाची योग्य ती किमत मिळण्यासाठी संघर्षाला तयार व्हावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्ष यांच्या एकत्रित शेतकरी संघर्ष समितीमार्फत अंकलखोप येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.ते म्हणाले, सत्ताधारी यांच्याशी हातमिळवणी करत खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित उसाला भाव न मागता कमी दरावर तडजोड करून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न केला आहे व आपल्यामुळे उसाला दर मिळतो असा डांगोरा पिटत आहेत. स्वत: खासदार असूनही सरकारने शेतकऱ्यांच्या उसाची ३ टक्के रिकव्हरी कमी करून किमान आधारभूत किंमत ठरविली. त्यावेळी खासदार शेट्टी कोठे होते, असा सवाल त्यांनी केला. उसाला उत्पादन खर्चावर आधारित ३५०० रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे. आयात साखरेसाठी सरकारने कर आकारावा, साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे, सरकारने साखर उत्पादनावरचा कर कमी करावा, त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दर देता येईल अशा मागण्या त्यांनी केल्या. यावेळी शेतकरी नेते बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, कारखानदारी परवडत नाही म्हणून ओरडणाऱ्यांनी कारखान्याची ५ ते ६ लायसन्स का घेतली आहेत? शेतकऱ्यांनी आता अभ्यासपूर्ण शेती करावी.यावेळी प्रकाश मिरजकर, सर्जेराव पवार, बाबूराव पाटील, पी. जी. पाटील (बुर्ली), श्रीकांत लाड, बी. जी. पाटील (बळीराजा संघटना) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वसंतराव बिरनाळे, संदीप सूर्यवंशी, राजकुमार पाटील, संजय संकपाळ, ए. डी. पाटील, भास्कर चौगुले, अरुण सावंत, उदयसिंह सूर्यवंशी, संग्राम पाटील, रमेश पाटील, शहाजी गुरव, घन:शाम सूर्यवंशी, विश्वास पाटील (बांबवडे) तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रकाश मिरजकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)अंकलखोप येथे ठिकाणी सर्व शेतकरी, संघटना ‘शेतकरी संघर्ष समितीच्या’ झेंड्याखाली एकत्रित आणण्याचा प्रयत्न असून या समितीच्या माध्यमातून ऊस लढ्यासाठी एकत्रित येण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्याची पहिली सभा अंकलखोपला झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.