शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोसावी समाज सुविधांपासून दूर

By admin | Updated: December 11, 2015 01:02 IST

‘बार्टी’कडून संशोधनाची गरज : अधिवेशनात लक्ष वेधणार

सहदेव खोत-- पुनवत--सध्या समाजात भटक्या जातीमध्ये समाविष्ट असलेल्या गोसावी समाजाच्या वाट्याला शासनाच्या दुर्लक्षामुळे सोयी-सुविधांअभावी दिवसेंदिवस मागासलेपण येऊ लागले आहे. निवास, शिक्षण, उद्योग आदी सर्वचबाबतीत या समाजाची परवड होत असून, या समाजाचे ‘बार्टी’मार्फत संशोधन होऊन त्यांना इतर जातींप्रमाणे सवलती मिळविण्यासाठी संघटनांनी कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत.भटक्या गोसावी समाजाची महाराष्ट्रात लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. आज हा समाज वाड्या-वस्त्यात, गावात, जंगलात वास्तव्यास आहे. तो सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांपासून वंचित आहे. भूमिहीन असल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न आहे. निवासाची गैरसोय आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने या समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. भटक्या गोसावी समाजाची जीवनशैली आदिवासी समाजासारखी आहे. आदिवासी बांधवांशी या गोसावी समाजाचे अनेक ठिकाणी रोटीबेटीचे व्यवहार चालतात. भूमिहीन असल्यामुळे मासेमारी, भंगार गोळा करणे, झाडपाल्याचे औषध विकणे, शेतकऱ्यांची जनावरे सांभाळायला घेणे, मध गोळा करणे आदी व्यवसाय करून हा समाज जीवन जगत आहे. बोलीभाषा भिन्न असल्यामुळे समाजाला शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कर्नाटक राज्यात या भटक्या गोसावी समाजास ‘डुंगरी ग्रासीया’ या आदिवासी समाजाच्या सवलती मिळत आहेत. या समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र सामाजिक न्याय विभाग (बार्टी) मार्फत या समाजाचे संशोधन होणे गरजेचे आहे. अखिल भारतीय गोसावी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार घाडगे, शिवाजी गोसावी, अनिल जाधव या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहेत. संशोधनाची मागणी गोसावी समाज हा आताच्या आधुनिक जमान्यातही दारिद्र्यात जीवन जगत असून शासनाच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत (बार्टी) याबाबत संशोधन व्हावे, अशी मागणी भटके गोसावी संघटनेचे सदस्य प्रकाश सावंत यांनी केली.