शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गोपीचंद पडळकर यांना अटक

By admin | Updated: July 18, 2014 23:31 IST

आटपाडीत समर्थकांची रॅली : ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हे, १0 जणांना अटक

आटपाडी : दरोड्याचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर आज, शुक्रवारी आटपाडी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना अटक केल्यानंतर अटकेच्या निषेधार्थ रासपच्या कार्यकर्त्यांनी आटपाडीत दुचाकींची रॅली काढली. पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात घोेषणाबाजी केली. पोलिसांवर दबाव आणल्याबद्दल ५०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा आटपाडी पोलिसांनी १० कार्यकर्त्यांना अटक केली. पडळकर यांची दि. २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दि. २४ मे २०१४ रोजी खरसुंडी (ता. आटपाडी) येथील कटरेवस्तीजवळ पूर्वीच्या भांडण्याच्या कारणातून आणि लग्नात वाद होऊन मारामारी झाली होती. त्यामध्ये सखुबाई पांडुरंग थोरात यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद गोरख राजाराम काळे (रा. पिंपरी बुद्रुक) यांनी दिली होती. फिर्यादीनुसार गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर, राजू अर्जुने, जगन्नाथ जानकर, रमेश दशरथ कातुरे, मधु कातुरे, विनोद वाघमारे, सुभाष चोपडे, दत्ता जावीर यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी सुभाष चोपडे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे, तर फरारी असलेले गोपीचंद पडळकर आणि विनोद लवाजी वाघमारे (दोघेही रा. झरे) यांना आटपाडी पोलिसांनी आज अटक केली. दरम्यान, रासपचे कार्यकर्ते सकाळपासून पंचायत समिती कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने जमले होते. अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळल्याने पडळकर आटपाडी पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याने कार्यकर्त्यांनी आटपाडीच्या मुख्य बाजारपेठेतून गृहमंत्री पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देत दुचाकी रॅली काढली. पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. आटपाडीचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे पडळकर यांच्या मागावर सकाळपासून होते. त्यामुळे पडळकर आणि पोलीस एकाचवेळी हजर झाले. तोपर्यंत कार्यकर्त्यांना पोलिसांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थोपवून धरून आत येण्यास मनाई केली. (पान ९ वर)