शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

सांगलीत घाटावर गर्दी : पावसाच्या उघडिपीने दिलासा

सांगली : दीड दिवसाच्या गणपतीबाप्पांना आज (शनिवारी) भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. कृष्णा नदीच्या घाटावर तसेच विविध उपनगरांत ठेवण्यात आलेल्या काहिलीमध्ये गणरायाचे ‘पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात विसर्जन केले. सकाळपासून सुरू असलेल्या वरुणराजाने सायंकाळी थोडी विश्रांती घेतल्याने भक्तांनी पायी चालत जाऊन गणेशाला निरोप दिला. शुक्रवारी सकाळी वाजतगाजत गणेशाचे आगमन झाले होते. आज दीड दिवसाच्या घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला. उपनगरातील भक्तांना विसर्जनासाठी नदीवर यायला लागू नये यासाठी महापालिकेतर्फे काही उपनगरांमध्ये मोठ्या काहिलीची व्यवस्था केली होती. त्याच्याजवळच निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. नदीकाठावर देखील महापालिका प्रशासनातर्फे विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरुणराजाने सायंकाळी विश्रांती घेतली व गणेशभक्तांना दिलासा दिला. दरम्यान, निर्माल्य नदीत टाकू नये यासाठी स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते नदीकडेला थांबून होते. त्यांच्याकडून गणेशभक्तांकडून निर्माल्य गोळा करण्यात येत होते. यापुढेही ही सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)