शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

महापालिकेला येणार आता ‘अच्छे दिन’

By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST

आर्थिक दिलासा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढले, थकित रकमांच्या वसुलीला प्रतिसाद

शीतल पाटील - सांगली  गतवर्षीच्या तुलनेत यंदा पालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. त्यात एलबीटीचे संकट टळल्याने पुढील चार महिन्यात पालिकेला ‘अच्छे दिन’ येणार आहेत. गतवर्षीच्या अंदाजपत्रकात १९८ कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मार्चअखेर उत्पन्नाचा आकडा १४० कोटींच्या घरात पोहोचल्याचे आज (दि. १) स्पष्ट झाले. आणखी चार ते पाच दिवस वसुलीसाठी मिळणार असल्याने, दोन ते तीन कोटीची भर पडू शकते. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या एलबीटी, पाणीपट्टी व घरपट्टी विभागाकडे दरवर्षी थकबाकीचा आकडा कोटीने वाढत होता. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी सक्षम यंत्रणा नसल्याने कोट्यवधीची थकबाकी होती. चालूवर्षी घरपट्टीकडे ५७ कोटीचे टार्गेट होते. आतापर्यंत ३०.५० कोटींची वसुली झाली आहे. घरपट्टीचा पदभार सहायक आयुक्त सुनील नाईक यांच्याकडे आल्यानंतर वसुलीला गती मिळाली. नागरिकांच्या दारात वाजंत्री वाजवून वसुली केली. त्यामुळे कधी नव्हे ते घरपट्टीची ५२ टक्के वसुली होऊ शकली. पाणीपुरवठा विभागाला गतवर्षी थकबाकीसह ३० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यात एचसीएल बंद पडल्याने सहा महिने पाणी बिलेच नागरिकांना मिळाली नाहीत. दोन महिन्यापूर्वी पालिकेने एकाच वेळी सहा महिन्यांची बिले दिली. पाणीपुरवठा विभागाने ७० टक्के वसुली करीत ३० कोटींपैकी २४ कोटींचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे. एलबीटीवरून दोन वर्षे वाद सुरू होता. व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली होती. गेल्याच आठवड्यात व्यापारी व महापालिकेत दिलजमाई झाल्याने एलबीटीचे संकट टळले आहे. गेल्यावर्षी एलबीटीतून १४० कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. ३० मार्चपर्यंत ७३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. एक आॅगस्टला एलबीटी रद्द होणार आहे. आणखी चार महिने व्यापाऱ्यांकडून थकित व चालू कराची वसुली होईल. एप्रिल महिन्यात एलबीटीतून बऱ्यापैकी पैसा तिजोरीत जमा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चार महिन्यांनी पालिकेला अच्छे दिन येणार असे दिसते. शासनाचा मदतीचा हातगत आर्थिक वर्षात पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली असताना, राज्य शासनाने मात्र पालिकेला मदतीचा चांगलाच हात दिला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष अनुदानापोटी २० कोटींचा निधी मंजूर केला. त्याशिवाय गुंठेवारी विकासासाठी १० कोटी, जिल्हा नियोजन समितीतून १० कोटी, वित्त आयोगातून ५ कोटीचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे पालिका हद्दीतील रस्ते व इतर कामे थोड्याफार प्रमाणात होऊ शकली. ३१ मार्चपर्यंत पालिकेकडून ठेकेदारांच्या बिलापोटी थोडीफार रक्कम दिली जात होती. हा शिरस्ता गेली कित्येक वर्षे सुरू आहे. पण यंदा एलबीटीच्या अडचणीमुळे तिजोरीच रिकामी झाली होती. त्यामुळे पहिल्यांदाच ३१ मार्चरोजी एकाही ठेकेदाराला बिल न देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. २०१५-१६ मधील अपेक्षित उत्पन्न कर विभाग : ३२.४७एलबीटी : १४०मालमत्ता विभाग : ०.५३फीपासूनचे उत्पन्न : १९.५७शासकीय अनुदान : १२.२७किरकोळ : ३.६९जलनिस्सारण विभाग : ४.१६पाणीपुरवठा : २९.३१एकूण : २४२२0१४-१५ ची वसुली एलबीटी : ७३घरपट्टी : ३०.५०पाणीपट्टी : २४ मालमत्ता : १.२७