शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

गोमेवाडीत अपघात : तीन ठार

By admin | Updated: July 8, 2014 00:49 IST

आठ जखमी : कंटेनरची जीपला धडक; मृत शेखरवाडीचे विठ्ठलभक्त

आटपाडी : वाखरी (ता. पंढरपूर) येथे रिंगण सोहळा पाहून परतताना शेखरवाडी (ता. वाळवा) येथील भक्तांची जीप आणि कंटेनरचा रात्री गोमेवाडी (ता. आटपाडी) जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे ठार झाले तर एक महिला आणि लहान मुलासह आठजण गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर करंजे (ता. खानापूर) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात जीपचा चालक जयवंत ऊर्फ गुंडा बबन लादे (वय २९, रा. शेखरवाडी, ता. वाळवा) हा जागीच ठार झाला. तर तानाजी बाळू माळी(४०, रा. शेखरवाडी) आणि पांडुरंग डवंग (रा. आरळी, ता. पन्हाळा) या दोघांचा सांगलीला उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. पांडुरंग बजरंग कार्इंगडे (वय २९), विशाल रामचंद्र दाभाडे (५५), भानुदास आकाराम कार्इंगडे (४८), नंदकिशोर आकाराम खोत (२१), संजय रंगराव खोत (३६), सुमन दिनकर खोत (४५), दिनकर महादेव खोत (६१) आणि संजोत सावंत (४) अशी जखमींची नावे आहेत. वाखरी (ता. पंढरपूर) येथे आज (सोमवारी) सायंकाळी चारच्या सुमारास बाजीरावाची विहीर येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला दोन तर तुकोबारायांच्या पालखीला एक अशी तीन रिंगण झाली. हा नयनरम्य सोहळा पाहून शेखरवाडीतील भक्तमंडळी जीपने गावी परत जात होती. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गोमेवाडीच्या पुढील भिवघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चढावर कंटेनर (क्रमांक एमएच ०९, डीए ५६५६) आणि जीप (एमएच १० व्ही. १२६५) यांची जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर रस्त्यावर आडवा झाला तर जीपचा चक्काचूर झाला. अपघाताची घटना समजताच आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शेलार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने करंजे (ता. खानापूर) येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. पावसाची रिपरिप आणि अंधारामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. (वार्ताहर)