शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात गणवेशामध्ये गोलमाल

By admin | Updated: October 8, 2015 00:37 IST

विद्यार्थी वंचित : वाटप झालेले गणवेशही निकृष्ट दर्जाचे, चौकशीची मागणी

जयवंत आदाटे - जत -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होऊन चार महिने पूर्ण होत आले, तरी तालुक्यातील सुमारे बारा ते चौदा शाळेत अद्याप गणवेश वाटप करण्यात आले नाही. ज्या शाळेत गणवेश वाटप झाले आहे, ते निकृष्ट दर्जाचे आहेत. गुणनियंत्रण विभागामार्फत या गणवेशाची तपासणी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन गणवेश म्हणून वाटप करण्यात येणाऱ्या कपड्यांचा रंग व दर्जा निश्चित करणे आवश्यक असते. परंतु शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्यक्ष बैठक न घेता कागदोपत्री बैठक झाली आहे, असे दाखवून काही शाळेत परस्पर गणवेशाचे कपडे खरेदी करण्यात आले आहेत. गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. मंगळवेढा येथील एका कापड दुकानातून जत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्यात यावा, असा तोंडी आदेश गटशिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी केंद्रप्रमुखांच्या बैठकीत दिला होता. परंतु हा तोंडी आदेश भविष्यात अडचणीचा होईल, याची जाणीव काही शिक्षकांनी जावीर यांना करून दिल्यानंतर त्यांनी हा आदेश मागे घेतला होता, अशी चर्चा आता तालुक्यात होऊ लागली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याचा गणवेश खरेदी करण्यासाठी शासन दोनशे रुपये खर्च करत आहे. परंतु जत तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या एका ड्रेसची किंमत सर्वसाधारणपणे १३० ते १५० रुपये इतकी आहे. उर्वरित पन्नास रुपये खर्च कोणासाठी व कोठे के ला, का त्यावर कोणी डल्ला मारला आहे ते समजून येत नाही. गणवेश वाटपाची सखोल चौकशी झाल्यास या प्रकरणातील गौडबंगाल बाहेर परणार आहे.जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुली व मुले यांची एकूण संख्या २९ हजार ३४२ इतकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दोनशे रुपयेप्रमाणे मार्च २०१५ मध्ये शासनाने सुमारे ५८ लाख ६८ हजार ४०० रुपये इतके अनुदान जत तालुक्यासाठी दिले होते.तालुका पातळीवरून केंद्रप्रमुख आणि प्रत्येक शाळेसाठी हे अनुदान वितरित करण्यात आले आहे. परंतु गणवेश खरेदी करून त्यांचे वाटप काही शाळांनी केले नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत, असा आरोप केला जात आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संयुक्तपणे गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार दिला जात आहे. काही शाळांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. परंतु तालुक्यातील काही शाळांनी अद्याप गणवेश वाटप केलेले नाहीत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती आता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. जत पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी संजय जावीर व सभापती लक्ष्मी मासाळ यांच्यात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारावरून जुंपली आहे. शालेय पोषण आहारप्रकरणी आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या उपस्थितीत संजय जावीर यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे जावीर यांची जत पं. स.मधील कारकीर्द दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारावरुन दोघात जुंपली