शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लाच म्हणून मागितली सोन्याची अंगठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:52 IST

सांगली : मोटार चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन वायफळे (ता. तासगाव) येथील गलई व्यावसायिकाकडे लाच म्हणून चक्क सोन्याच्या ...

सांगली : मोटार चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन वायफळे (ता. तासगाव) येथील गलई व्यावसायिकाकडे लाच म्हणून चक्क सोन्याच्या अंगठीची मागणी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस शिपाई सूर्यकांत सावंत (रा. विजयनगर, सांगली) याच्याविरुद्ध शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पथकाने ही कारवाई केली.उत्तर प्रदेश राज्यातील माजीपूर येथे तक्रारदाराचा गलई व्यवसाय आहे. पुण्यात काही दिवस त्यांनी व्यायाम शाळेत प्रशिक्षक म्हणून नोकरी केली. त्यावेळी त्यांच्या मित्राने मोटार विक्रीसाठी त्यांना मध्यस्थ करुन घेतले होते.या मित्राने एका ग्राहकास मोटार विकली, पण सर्व रक्कम मिळाल्याशिवाय नावावर करुन देणार नाही, असे सांगितले. पण हा ग्राहक बरेच दिवस आलाच नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या मित्राने मोटार दुसऱ्याच ग्राहकाला विकली. हा प्रकार प्रथम व्यवहार केलेल्या ग्राहकाला समजला. त्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात तक्रार केली. पोलीस शिपाई सूर्यकांत सावंत याच्याकडे हे प्रकरण देण्यात आले होते.सावंत याने मोटार विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थी केलेल्या तक्रारदारास चौकशीसाठी बोलाविले. तक्रारदाराने ‘माझा यामध्ये काही संबंध नाही’, असे सांगितले. त्यावेळी सावंत याने ‘तुला यातून बाहेर काढतो, मला काही तरी द्यावे लागेल’, असे सांगून लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे कार्यालयात तक्रार केली होती. या विभागाने तक्रारीची चौकशी केली असता, सावंत याने तक्रारदारास मोटार चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सोन्याच्या अंगठीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, श्यामसुंदर बुचडे, नवनाथ कदम, रुपेश माने, सूरज अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली.दुचाकी न ओळखल्याने ‘ट्रॅप’ अयशस्वीसावंत याने तक्रारदारास १ आॅक्टोबर २०१८ रोजी सोन्याची अंगठी घेऊन विजयनगरमध्ये सत्राळकर कॉम्प्लेक्स येथे येण्यास सांगितले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तेथे सापळा लावला. सावंत याने सोन्याची अंगठी शासकीय दुचाकीच्या हेडलाईटच्या काचेजवळ ठेवण्यास सांगितले होते. परंतु तक्रारदारास ही शासकीय दुचाकी ओळखता आली नाही, त्यामुळे अंगठीही ठेवता आली नाही. त्यामुळे हा सापळा अयशस्वी ठरला.