शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम, भवनासाठी पणनमंत्र्यांना साकड

By admin | Updated: January 19, 2015 00:30 IST

समितीचे त्रिभाजन करा : चेंबर आॅफ कॉमर्सची मागणी े

सांगली : गोदाम, कोल्डस्टोअरेजच्या अभावाने व्यापारी, शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, यासह बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने पणन व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात यावे, अशीही मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मार्केट यार्ड व बाजार समितीमधील विविध समस्या त्यांच्यापुढे सादर केल्या. बाजार समितीला वर्षाला कोट्यवधी रुपयांचा सेस रूपाने कर मिळत असताना पायाभूत सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. विशेषत: हळद, गूळ व मका साठवणुकीसाठी अनेक समस्या निर्माण होत आहे. हरिपूर येथील पेव आता खराब झाले असून, हळद साठवणुकीच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर्षी हळदीचे उत्पादन मोठ्याप्रमाणात झाल्याने साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हळदीसाठी किमान दोन ते अडीच लाख पोत्यांच्या साठवणुकीसाठी गोदामाची गरज आहे. यावर्षी पाच हजार रुपये क्विंटलची हळद किडल्याने दीड हजार रुपये क्विंटलने विक्री करण्याची वेळ व्यापारी व शेतकऱ्यांवर आली आहे. हळदीसाठी जगप्रसिध्द असणाऱ्या सांगलीच्या बाजारपेठेत हळदीसाठी गोदाम नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती गूळ, मका व इतर शेतीमालाची आहे. बेदाण्यासाठीही कोल्डस्टोअरेज उभारण्याची गरज आहे. बाजार समितीमध्ये आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांतून सांगलीमध्ये शेतीमाल घेऊन शेतकरी येतात; मात्र त्यांच्यासाठी शेतकरी भवन उभारण्यात आलेले नाही. त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहे, हमालांसाठी विश्रांतीगृह, रस्ता, पाणी, वीज आदी सुविधांचीही मागणी करण्यात आली आहे. सांगलीच्या बाजार समितीमध्ये कवठेमहांकाळ, जत तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ, जत तालुके आता सक्षम झाल्याने या समित्या आता सांगलीपासून वेगळ्या करण्यात याव्यात, अशीही मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)सांगली बाजार समितीची व्याप्ती आता वाढली असून, गोदाम, कोल्डस्टोअरेजसारख्या सुविधांची आज गरज आहे. यासाठी पणन मंत्र्यांकडे मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. हळदीची आवकही वाढली असून, त्यासाठी गोदामाची आज नितांत गरज आहे. यासाठी बाजार समितीला निधी देण्याची गरज आहे.- मनोहर सारडा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली