शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

देवा गणराया, महापालिकेला माफ कर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:45 IST

शीतल पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दोन आठवड्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना, शहराच्या विविध भागात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या मात्र वाढतच आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका हद्दीतील रस्ते चकाचक करू, अशी ग्वाही खुद्द आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिली होती. पण वर्षभरात रस्त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. उलट रस्ते खड्ड्यांतच गेल्याने त्याचा त्रास ...

शीतल पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दोन आठवड्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना, शहराच्या विविध भागात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या मात्र वाढतच आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका हद्दीतील रस्ते चकाचक करू, अशी ग्वाही खुद्द आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिली होती. पण वर्षभरात रस्त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. उलट रस्ते खड्ड्यांतच गेल्याने त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुसरा गणेशोत्सव आला तरी खड्डे जैसे थेच आहेत. महापालिकेच्या या लाल फितीच्या कारभारामुळे ‘बाप्पा, महापालिकेला माफ कर’, असे म्हणण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे.सांगलीकरांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन यंदाही खड्ड्यांतूनच होणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षीही गणरायाला खड्ड्यांतून आणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. अगदी ‘श्रीं’चे विसर्जनही खड्ड्यांतूनच झाले. खड्ड्यांचे विघ्न पुढीलवर्षी नसेल, असे महापालिकेच्या जबाबदार पदाधिकारी, अधिकाºयांनी अनेकदा सांगितले. पण परिस्थितीत बदल झाला नाही. गेल्यावर्षी सांगलीत चांगला पाऊस पडला. आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेताच पावसाने त्यांचे स्वागत केले. शामरावनगरसह अनेक उपनगरांत पाणी साचले. शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरांतील रस्ते खड्ड्यात गेले. नगरसेवकांनी मुरूमाची मागणी केली. पण आयुक्तांनी मुरूमात घोटाळा होतो, असे कारण देत पुढीलवर्षी पक्के रस्ते करू, असे सांगत नागरिकांची सहानुभूती मिळविली.पण वर्षभरात यातील कोणत्याच गोष्टी झाल्या नाही. अगदी पावसाच्या पहिल्याच दणक्यात पुन्हा उपनगरे चिखलात रुतली. कदाचित पावसालाच दया आल्याने, महिनाभर त्याने सांगलीकडे पाठ फिरविली आहे. खड्डेमुक्त शहराची घोषणा त्यावेळीही प्रशासनाने केली. महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते यांच्यासारख्या वरिष्ठ पदाधिकाºयांनी ढोल वाजून, खड्डे मुजविले जातील, पुढीलवर्षी चांगले रस्ते असतील, असे सांगून नागरिकांची बोळवण केली. पण त्यांची वक्तव्ये ‘बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ ठरली आहेत.वारंवार बैठका : फलित काय?आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून अनेक विभागांच्या बैठका घेतला. पण त्यांचे फलित काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुजविण्याबाबत ५ आॅगस्ट रोजी बैठक होणार होती. पण काही कारणास्तव ही बैठक रद्द झाली. वास्तविक खड्डे मुजविण्यासाठी बैठक घ्यावी लागते, हीच मुळात दुर्दैवी बाब आहे. आतापर्यंत ९० कोटीच्या फायली मंजूर केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. इतका निधी वर्षभरात खर्ची पडत असेल अथवा मंजुरी मिळत असेल, तर सांगलीची दुर्दशा का झाली?, याचे उत्तरही प्रशासनाने देणे क्रमप्राप्त आहे.खड्डे दिसूनही दुर्लक्षपहिल्याच पावसात शहरातील रस्ते खड्ड्यात गेले. त्यानंतर काही रस्त्यांवर पॅचवर्क झाले, पण तेही दुसºया पावसात वाहून गेले. खड्डे मुजविलेल्या रस्त्यांवरच खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अगदी महापालिकेच्या दारातून बाहेर पडताच तीनही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. आयुक्त खेबूडकर यांचे निवासस्थान असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या रस्त्यावर तर खड्ड्यांची मोजदादच करता येत नाही. महापौरांपासून ते नगरसेवकांपर्यंत सारेच खड्ड्यांतून येतात. पण त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत. महापालिकेकडे चकरा मारताना अधिकारी, पदाधिकारी ज्या स्टेशन रोडवर येतात, तो रस्ताही खड्ड्यात गेला आहे. शंभरफुटी, संजयनगर, यशवंतनगर, चैतन्यनगर, चिन्मय पार्क, गावभाग अशा एक ना अनेक उपनगरांतील रस्त्यांवर खड्डे आहेत. जिल्हा सुधार समितीसारख्या काही सामाजिक संघटनांना खड्डेप्रश्नी आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाºयांना जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुर्दाड महापालिकेकडून आंदोलनापुरतेच खड्डे मुजविले जात आहेत. इतर ठिकाणी महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाºयांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे. त्यामुळे यंदाही सांगलीकरांना गणरायाचे स्वागत खड्ड्यांतून करावे लागणार आहे. विघ्नहर्त्यामागील खड्ड्यांचे विघ्न कधी संपणार?, असा प्रश्नच गणेशभक्तांना पडला आहे.