शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

साखरसम्राटांना सदाभाऊंची चपराक

By admin | Updated: March 21, 2017 23:43 IST

वाघवाडी कृषी महाविद्यालयास नाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सन्मान

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर वाळवा तालुक्यातील राजारामबापू पाटील यांनी निर्माण केलेल्या सर्वच सहकारी संस्थांना त्यांच्या राजकीय वारसदारांनी बापूंचे नाव दिले आहे. याउलट सर्वसामान्य शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मंत्री झालेल्या सदाभाऊ खोत यांनी वाघवाडी येथे होणाऱ्या कृषी महाविद्यालयाला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव देऊन साखरसम्राटांना चपराक दिली आहे.महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील साखरसम्राटांनी ऊस उत्पादकांच्या जिवावर राजकीय बस्तान बसवले आहे. त्यांनी साखर उद्योगाच्या साहाय्याने शैक्षणिक, वित्तीय आणि सहकारी संस्था निर्माण केल्या. मात्र या संस्थांना घरातील नेत्यांचेच नाव देण्याचा फंडा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अलीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सर्वच सहकारी साखर कारखान्यांची नावे बदलण्याचा फंडा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. कारखान्याची सत्ता बदलली की कारखान्याचे नाव बदलण्याचे राजकारणही खेळले जात आहे. वाळवा तालुक्यातील राजारामबापू उद्योग समूहात हेच दिसते. राजारामबापू पाटील यांनी आपल्या कारकीर्दीत वाळवा सहकारी साखर कारखाना, वाळवा सहकारी बँक, वाळवा सहकारी दूध संघाची स्थापना केली होती. कालांतराने सर्वच संस्थांचा विस्तार वाढत गेला. राजारामबापूंच्या पश्चात त्यांचे पुत्र आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक संस्थेला राजारामबापूंचे नाव देण्याचा सपाटा लावला आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतले तरीही, सत्तेच्या जोरावर त्यांनी सर्व विरोध धुडकावून लावत हवे तेच केले.इस्लामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या इमारती, प्रकल्प, संकुलांना राजारामबापूंचेच नाव देण्यात आले आहे. नाट्यगृह नामकरणावेळी तर गदारोळ झाला. शिवसेनेने एका रात्रीत डिजिटल फलक लावून नाट्यगृहाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी अखेर नाट्यगृहाला राजारामबापूंचेच नाव दिले. पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकामानंतर येथील वसंतदादा सभागृहाचे नाव बदलून राजारामबापूंचे नाव देण्यात आले. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परंतु येथे जयंत पाटील यांचाच विजय झाला. शासनाकडूनही राजारामबापूंचे नाव ठेवण्याचा निर्णय कायम झाला.क्रांतिसिंहांच्या विचारावर श्रध्दा आता राज्यातील साखरसम्राटांच्या मक्तेदारीला विरोध आणि जयंत पाटील यांना चपराक देण्यासाठीच वाघवाडी येथे होणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालयाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव दिले आहे. सदाभाऊ यांची क्रांतिसिंहांच्या विचारांवर श्रद्धा आहे. या श्रद्धेची जपणूकच त्यांनी यातून केली आहे, अशी चर्चा सध्या वाळवा तालुक्यामध्ये सुरु झाली आहे.