शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

सरताळे कुटुंबियांची जमीन परत देण्याचा ठराव मंजूर

By admin | Updated: December 24, 2014 23:39 IST

दिघंचीत विशेष ग्रामसभा : गावात कडकडीत बंद

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील सरताळे कुटुंबियांची जमीन परत मिळावी यासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत अमोल मोरे यांनी सरताळे कुटुंबियांची जमीन परत द्यावी, असा ठराव उपसरपंच हणमंतराव देशमुख यांनी मांडला. मात्र ठराव मांडल्यानंतर ग्रामसभेमध्ये वादावादी झाली. दरम्यान, गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी आंदोलनास पाठिंबा दिला.सरताळे कुटुंबियांचे गेले तीन दिवस ग्रामदैवत महादेव मंदिराजवळ बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणास उपसरपंच हणमंतराव देशमुख यांच्यासह विविध संघटना, पदाधिकारी आदींनी पाठिंंबा दिला आहे. आज सकाळी दहा वाजता महादेव मंदिराच्या प्रांगणात ग्रामसभा बोलाविली होती. ग्रामसभेमध्ये एकच ठराव मांडण्यात आला व सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. सभेमध्ये विरोधी कार्यकर्त्यांनी या ठरावावर आक्षेप घेत, पुन्हा एकदा ग्रामसभेत चर्चा करण्याची मागणी केली. ही मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली. यावरून ग्रामसभेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर येथील तणाव निवळला.उपोषणास पाठिंंबा म्हणून सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता गावामध्ये पूर्ण व्यवहार ठप्प होते. पोलिसांच्या आवाहनानंतर दुपारी १२ वाजता दुकाने उघडण्यात आली. तसेच व्यापारी पेठेत व्यवहार पूर्ववत सुरू झाले. (वार्ताहर)