ढालगाव : नागजच्या ओढ्यात टेंभूचे पाणी १० एप्रिलपर्यंत सोडणार असल्याचे आश्वासन खा. संजय पाटील यांनी दिली.नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील शिवकृपा हॉटेल येथे शेतकऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी नागज ते किडेबिसरी पाचेगावपर्यंत त्यांनी कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.ढालगाव घाटमाथा व आगळगाव उपसासिंचन योजना ही पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यामध्ये कोणतेही राजकारण न आणता येथील शेतकऱ्यांना पाणी देणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले.ढालगावला पाणी देण्यासाठी तातडीने दोन्ही रस्ते (विजापूर-गुहागर व मिरज-पंढरपूर) खुदाईसाठी परवानगी पत्र तयार करण्याचे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.टेंभूचे पाणी या भागाला देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, १० एप्रिल ही शेवटची डेडलाईन असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत कंत्राटदारांनाही आम्ही विश्वासात घेतले आहे. अधिकारी, कंत्राटदार व लोकप्रतिनिधी मिळून आम्ही हे काम वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.माजी सभापती चंद्रकांत हाक्के यांनी येथील समस्या सांगितल्या. यावर ढालगावचे माजी उपसरपंच बापूसाहेब खुटाळे यांनी आक्षेप घेत ढालगावचे प्रश्न मांडण्यास आम्ही समर्थ असल्याचे सांगितले.यावेळी सभापती वैशाली पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, अनिल बाबर, तम्माण्णा घागरे, औदुंबर पाटील, डॉ. दिलीप ठोंबरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)मुख्यमंत्री पाणी सोडण्यास तयारअधिकारी, कंत्राटदार व लोकप्रतिनिधी मिळून आम्ही हे काम वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. येथील पाणी आणि चारा टंचाईमुळे येथील जनावरे कवडीमोल किमतीने विकली जात असल्याची जाणीव असल्याचे आपण मुख्यमंत्री, गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे.
‘टेंभू’चे पाणी महिन्यात देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 00:32 IST