शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

पाटाच्या दराने उपसा योजनांचे पाणी द्या

By admin | Updated: June 27, 2015 00:21 IST

वैभव नायकवडी : आटपाडीत १३ दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद

आटपाडी : उपसा जलसिंचन योजनांची पाणीपट्टी शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यासाठी पाटाने देण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या दरानेच टेंभूसारख्या उपसा जलसिंचन योजनांचे शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे. येत्या ३ महिन्यात शासनाने हा निर्णय केला नाही, तर दुष्काळग्रस्तांच्यावतीने संघर्ष उभा करण्याचा इशारा हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी पाणी परिषदेत दिली.कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील जनतेची २३ वी पाणी संघर्ष परिषद शुक्रवारी आटपाडीतील भवानी विद्यालयाच्या पटांगणात झाली. प्रारंभी पाणी परिदेचे निमंत्रक क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी वैभव नायकवडी म्हणाले, चळवळीच्या रेट्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. आता आटपाडी, सांगोल्यात पाणी गेले. मंगळवेढ्यालाही पाणी गेले पाहिजे. टेंभूच्या मुख्य कालवा, पोटकालव्यांची कामे कालबध्द झाली पाहिजेत. त्यासाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे. ही योजना कार्यान्वित होऊन उपयोगी नाही. तिची पाणीपट्टी, वीज बिल शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. कर्नाटक शासन १० अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्याला मोफत वीज देतेय. यातून आदर्श घेऊन राज्य शासनाने शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून ठिबक सिंचन योजनेद्वारे पाणी द्यावे. आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, राज्यात ३० हजार कोटी खर्चाच्या सिंचन योजनांचे काम सुरू आहे. त्यासाठी आतापर्यंत ११ हजार कोटी रूपये खर्च झाले आहेत. या भागातील हजारो वर्षांचा दुष्काळ चळवळीच्या जोरावर साकारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू योजनेमुळे हटणार आहे. अर्थमंत्री मुनगंटीवर यांनी येत्या ३० जूनच्या आत ७० कोटी आणि जुलै अधिवेशनात ८० कोटी देण्याचे मान्य केले. हे आश्वासन त्यांनी पाळले नाही, तर चळवळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून संघर्षाची भूमिका ठरवू. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, प्रा. शरद पाटील, प्रा. बाबूराव गुरव, चंद्रकांत देशमुख, हणमंतराव देशमुख प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर देशमुख यांची भाषणे झाली. परिषदेस हजारोंच्या संख्येने दुष्काळग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)महाराष्ट्र सर्वात मागे...पंजाबमध्ये ९८ टक्के, हरियाणात ८५ टक्के, उत्तर प्रदेशात ७० टक्के, मध्य प्रदेशात ३६ टक्के, गुजरातमध्ये ४८ टक्के आणि महाराष्ट्रातून ज्या आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदी जाते, तिथे ४९ टक्के, तर कर्नाटकात ३४ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात देशात सर्वात कमी १८ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. त्यापैकी ९ टक्के जमीन ही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी पाडून बागायती केली आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील शेतीचा विकास करावा लागेल आणि शेतीचा विकास करायचा, तर शासनाने सिंंचनाची व्यवस्था केली पाहिजे, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी परिषदेत व्यक्त केले.महाराष्ट्र सर्वात मागे...पंजाबमध्ये ९८ टक्के, हरियाणात ८५ टक्के, उत्तर प्रदेशात ७० टक्के, मध्य प्रदेशात ३६ टक्के, गुजरातमध्ये ४८ टक्के आणि महाराष्ट्रातून ज्या आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदी जाते, तिथे ४९ टक्के, तर कर्नाटकात ३४ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात देशात सर्वात कमी १८ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. त्यापैकी ९ टक्के जमीन ही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी पाडून बागायती केली आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील शेतीचा विकास करावा लागेल आणि शेतीचा विकास करायचा, तर शासनाने सिंंचनाची व्यवस्था केली पाहिजे, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी परिषदेत व्यक्त केले.