शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

गुंठ्याला दोन हजार भरपाई द्या

By admin | Updated: February 18, 2016 21:45 IST

चंदगडच्या शेतकऱ्यांची मागणी : हत्ती, गव्यांच्या उपद्रवप्रश्नी गडहिंग्लजला संयुक्त बैठक

गडहिंग्लज : हत्ती व गव्यांमुळे नुकसान होणाऱ्या शेतीला प्रतिगुंठा दोन हजार रुपयांप्रमाणे भरपाई मिळावी, अशी मागणी हत्ती उपद्रव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांची संमती घेऊन भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही डीएफओ रंगनाथ नाईकडे यांनी दिली. हत्ती आणि गव्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आठवड्यापूर्वी पाटणे आणि चंदगड येथील वनखात्याच्या कार्यालयांना टाळे ठोकले होते. येथील सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी डीएफओंच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्याच अध्यक्षतेखाली प्रांतकचेरीत ही बैठक झाली.अ‍ॅड. संतोष मळवीकर म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून चंदगड तालुक्यात हत्तींचा उपद्रव सुरू आहे. मात्र, त्यावर वनखात्याला अद्याप उपाय सापडलेला नाही. ही दुर्दैवी बाब आहे. आम्हाला तुटपुंजी भरपाई नको, आमची संपूर्ण जमीनच शासनाने ताब्यात घ्यावी. शेतीला गुंठ्याला दोन हजार, फळझाडांना प्रतिवृक्ष पाच हजार आणि कृषिपंप पाईपलाईनसह शेतीअवजारांची भरपाई बाजारभावाप्रमाणे द्यावी.संग्रामसिंह कुपेकर म्हणाले, तिलारीच्या जंगलात अजूनही आदी मानवाचे वास्तव्य आहे. दुर्मीळ वन्यप्राण्यांसह समृद्ध वनसंपदेचा आम्हालाही अभिमान आहे. मात्र, जंगली हत्ती व गव्यांच्या उपद्रवामुळे चंदगडकरांचे जगणे हैराण झाले आहे. त्यावर ठोस उपाययोजना व्हावी. नाईकडे म्हणाले, आपण ‘चंदगड’मधील प्रश्नांच्या संदर्भात पाठपुरावा केल्यामुळेच पिकांच्या भरपाईत भरीव वाढ झाली आहे. हत्ती हलविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे.चर्चेत जि. प. सदस्य तात्यासाहेब देसाई, कोळिंद्रेचे सरपंच रूपेश अनगुडे, गुडवळेचे सरपंच संतोष गावडे, विवेक पाटील, आप्पाजी गावडे, पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांनीही चर्चेत भाग घेतला.बैठकीस ‘आजरा’चे उपाध्यक्ष सुनील शिंत्रे, सभापती मीनाताई पाटील, उपसभापती तानाजी कांबळे, जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली व शैलजा पाटील, राजन देसाई, एस. बी. तडवळेकर व सी. जी. गुजर, पोलीस निरीक्षक महावीर सकळे, आदींसह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘डीएफओ’वर हल्लाबोलआठवड्यापूर्वीच्या आंदोलनाच्यावेळी हत्ती उपद्रवग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा अन्य विषय महत्त्वाचे आहेत. आंदोलक ांवर गुन्हे दाखल करा, अशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी बैठकीतच ‘डीएफओं’चा निषेध केला. हत्ती थेट घरात घुसत असल्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे. हत्तींना हलवा, नाहीतर आम्हाला बंदुका हातात घ्याव्या लागतील, असा इशारा अ‍ॅड. मळवीकर यांनी दिला.सारेच ‘पक्ष’ आले धावून !जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे गेल्या १२ वर्षांपासून चंदगडचा शेतकरी संतप्त आहे. या प्रश्नावर अनेकदा आंदोलने झाली. केवळ चर्चा-बैठकांपलीकडे कोणत्याही राजकीय पक्षाचा या प्रश्नात ठळक सहभाग दिसला नाही. मात्र, ‘एव्हीएच’च्या श्रेयवादाचे राजकारण रंगत असतानाच शिवसेना, राष्ट्रवादीसह जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस लावलेल्या हजेरीची चर्चा झाली.