शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

नागपंचमीचा प्रस्ताव केंद्राला द्या

By admin | Updated: April 8, 2017 00:03 IST

सुधीर मुनगंटीवार : मुंबईत बैठक; कम्युनिटी रिझर्व्हबाबत विधी, वन विभागाला अभ्यासाची सूचना

शिराळा : कालबाह्य झालेल्या कायद्यात बदल करून, हजारो वर्षांची परंपरा असलेली शिराळा येथील नागपंचमी सुरू करण्यासाठी कम्युनिटी रिझर्व्हचा अभ्यास करून, प्रसंगी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून फक्त शिराळा गावासाठी नागपंचमी सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून, विधी न्याय विभाग व वन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मुंबई येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.चार दिवसांपूर्वी आ. शिवाजीराव नाईक यांनी, नागपंचमीची परंपरा व भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून हजारो वर्षापासून सुरू असलेली जिवंत नागाची पूजा करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी बैठक झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी, मी शिराळा येथील दौरा केला असून, लोकांच्या भावना समजून घेतल्या आहेत. ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदनही दिले होते. शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्यात येत असून, याला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र येथील भाविकांच्या श्रद्धेचा, परंपरेचा विचार करून आणि कालबाह्य कायद्यात दुरुस्ती करून व कम्युनिटी रिझर्व्हचा अभ्यास करून त्यातून मार्ग काढला जाईल. प्रसंगी नागपंचमी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडेही प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना वन व विधी न्याय विभागाला दिल्या असून, याबाबतचा प्रस्ताव देऊन मार्ग काढणार असल्याचे सांगितले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदीनी या तालुक्यात झालेल्या विविध सभांमध्ये नागपंचमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बैठकीस प्रधान सचिव जामदार, वन सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक एम. के. राव, कोल्हापूर विभागाचे वन संरक्षक अरविंद पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे, उत्तम निकम, रणधीर नाईक, रणजित नाईक, अजित पाटील, संतोष गायकवाड, संतोष पाटील, संदीप पाटील, अ‍ॅड. नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. (वार्ताहर)शिराळकरांचा तीव्र लढा...नागपंचमीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर २०१४ पर्यंत अंतरिम आदेशानुसार जिवंत नागपूजा वन विभागाच्या देखरेखीखाली चालू होती. मात्र २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने अंतिम निकालात जिवंत नाग पकडणे व पूजेस बंदी घातली. यामुळे शहरामध्ये तसेच भाविकांच्यात तीव्र नाराजी पसरली. शिराळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. सहा महिन्यापूर्वी नगरपंचायतीची पहिली निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी सर्व नागरिक, नाग मंडळे कार्यकर्ते सर्वपक्षीय यांनी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालायचे ठरविले. त्यामुळे निवडणूक स्थगित करावी लागली होती.