शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये घरकोंबडा झालेल्या मुलांसाठी मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:24 IST

सांगली : लॉकडाऊनमध्ये घरकोंबडा व्हावे लागलेल्या मुलांसाठी शिक्षण परिषदेने ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ हा अभिनव उपक्रम सुरू केला ...

सांगली : लॉकडाऊनमध्ये घरकोंबडा व्हावे लागलेल्या मुलांसाठी शिक्षण परिषदेने ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरू केलेला ‘गोष्टीचा शनिवारही’ लोकप्रिय ठरला आहे. युनिसेफ, प्रथम बुक स्टोरी व्हिवर आणि शैक्षणिक संशोधन परिषदेचा हा संयुक्त उपक्रम आहे.

सध्या शाळा सुरू झाल्या असल्या, तरी अजूनही ऑनलाईन शिक्षणदेखील सुरू आहे. कोरोनामुळे मुलांच्या अवांतर वाचनावर मर्यादा आल्या आहेत. ऑनलाईनच्या नावाखाली मुले मोबाईलमध्ये गुरफटण्याचा धोका आहे. यातून सुटकेसाठी गोष्टीचा शनिवार व मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका उपक्रम सुरू केल्याची माहिती डाएटचे प्रााचार्य रमेश होसकोटी यांनी सांगितले.

याअंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी गोष्टींच्या पीडीएफ फाईलीची लिंक व्हॉटस‌्ॲपवरुन पाठविली जाते. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमात ती उपलब्ध आहे. जिल्हा व तालुकास्तरावरुन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विविध व्हॉटस‌्ॲप ग्रुपवर शेअर केली जाते. शनिवार ते मंगळवार असे चार दिवस लिंकमधील गोष्ट विद्यार्थ्यांनी वाचून त्यातील उपक्रम सोडविणे अपेक्षित आहे. आपल्या विषय शिक्षकांकडून उपक्रम तपासून घेण्याच्याही सूचना आहेत.

या उपक्रमासाठी शिक्षण परिषदेने योग्य वाचन साहित्य आणि सुंदर चित्रे असणारी मनोरंजक पुस्तके निवडली आहेत. विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरुपात ती उपलब्ध आहेत. जिल्हास्तरावर डाएटच्या माध्यमातून हे उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी तालुकानिहाय समन्वयक नेमल्याची माहिती प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी दिली.

चौकट

०८०६८२६४४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या

वाचन संस्कृती वाढविण्यासाठीच्या ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ उपक्रमाअंतर्गत फोनवरून गोष्ट ऐकता येते. स्मार्ट व साध्या अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनचा वापर करता येतो. त्यासाठी ०८०६८२६४४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागतो. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत गोष्टी ऐकता येतात.

---------