रेठरे धरण : कोरोनाच्या साथीमुळे गेले दीड वर्षांपासून सर्व प्रकारचे कार्यक्रम बंद असलेने वारकरी संप्रदायातील कलाकारांची उपासमार चालू आहे. आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी वारकरी संप्रदायाचे वतीने नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना निवेदन दिले.
वारकरी संप्रदायाशी निगडित असलेल्या गायन, कीर्तनकार, प्रवचनकार, भजन, वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांची लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम बंद आहेत. यामुळे ते आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कलाकार मानधन योजनेअंतर्गत या कलाकारांना मानधन, आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी वारकरी संप्रदायातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.
यावेळी वारकरी संप्रदाय संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी, ज्ञानराज भक्ती प्रतिष्ठान रेठरे धरणचे अध्यक्ष तानाजी पवार, राजेंद्र पवार, गणपती कोकरे, हंबीरराव माळी, गणपती कोकरे, सुरेश पाटील, भीमराव पाटील, पंढरीनाथ कोळेकर, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.