शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षांसाठी मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

करगणी : वाढदिवसाचा खर्च टाळून त्याबद्दल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्याचे आवाहन सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ...

करगणी : वाढदिवसाचा खर्च टाळून त्याबद्दल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्याचे आवाहन सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा व उन्नती महिला विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनिता पाटील यांनी केले.

नवीन वर्ष व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस व आटपाडी येथील उन्नती महिला विकास फौंडेशनच्या माध्यमातून अनिता पाटील यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. वाढदिवसाचा खर्च टाळून स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुस्तके भेट द्यावीत, त्याचे नियोजन अनिता पाटील करत आहेत. अनिता पाटील या आटपाडी तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मोफत लायब्ररी व मार्गदर्शन केंद्र सुरू करत आहेत. ही पुस्तके लायब्ररीतून मुलांना मोफत दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाचा सांगली जिल्हा युवती पुरस्कार अनिता पाटील यांना मिळाला होता. या पुरस्काराची रक्कम अनिता पाटील मोफत लायब्ररीसाठी खर्च करणार आहेत. त्या अनुषंगाने मोफत लायब्ररी व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यासाठी अनिता पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत.

या उपक्रमास साथ देत शेटफळे येथील प्रा. धनाजी गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनिता पाटील यांच्या उपक्रमासाठी पोलीस भरती, राज्य सेवा परीक्षेची पुस्तके अनिता पाटील यांना भेट देऊन एक वेगळा आदर्श घालून दिला.

यावेळी संध्या गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस आटपाडी सोशल मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड उपस्थित होते.

फाेटाे : ०६ करगणी १