शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या दुष्काळ मुक्तीसाठी ‘म्हैसाळ’ला निधी द्या

By admin | Updated: October 27, 2015 00:10 IST

विलासराव जगताप : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याप्रसंगी मागणी; तालुक्याचे विभाजनही तातडीने करण्याची गरज

जत : जत तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून उर्वरित कामासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी अपेक्षा आ. विलासराव जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जत तालुका दौऱ्याच्यानिमित्ताने व्यक्त केली आहे.जत तालुका जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून त्याचा भौगोलिक विस्तार जादा आहे. १२० कि.मी. इतकी पूर्व-पश्चिम लांबी आहे. तालुका विभाजनाचा प्रश्न १९८४ पासून प्रलंबित आहे. प्रत्येकवेळी तालुका विभाजनाची मागणी केली जात आहे. परंतु आजपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदार आणि जनतेला तालुका विभाजन करण्याचे आश्वासन दिले आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने त्याची पूर्तता व्हावी, अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.पूर्व भागातील ७२ गावांसाठी नगारटेक (जत) येथून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्याचा नियोजित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना मंजूर होऊन सुरु झाल्यानंतर पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. याशिवाय पाणीटंचाई कालावधित टँकरवर प्रतिवर्षी होणाऱ्या लाखो रुपये खर्चाची बचत होणार आहे. नियमित आणि वेळेवर शुद्ध पाणी नागरिकांना मिळू लागल्यानंतर नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. त्यासाठी शासनाने या प्रस्तावित योजनेस तात्काळ मंजुरी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.खरीप हंगामातील गावांचा शासनाने दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. उर्वरित रब्बी हंगामातील ७२ गावांचाही शासनाने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणे आवश्यक आहे. तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला होता. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. आता आठ-दहा दिवसात पाऊस झाला नाही, तर रब्बी हंगामही वाया जाणार आहे. सध्या या कडक उन्हामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिके करपू लागली आहेत. खरीपप्रमाणे रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शासनाने ७२ गावांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करुन येथील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)जलयुक्त शिवार अभियानातून दहा कोटींची कामेजलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत शासनाने तालुक्यातील ४२ गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे या गावात शासनाने सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून सिमेंट नालाबांध, पाझर तलाव, नालाबांध, तलावातील गाळ काढणे आदी कामे करून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे व पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे. जत तालुक्यावर असलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरुपी पुसण्यासाठी संपूर्ण जत तालुक्याचा जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमात समावेश करुन तेथे जमिनीखालील पाणीपातळी वाढविणारे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे जगताप यांनी सांगितले.