शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जात सूट देत पर्याय द्यावा

By admin | Updated: April 9, 2017 23:42 IST

सी. रंगराजन : अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार प्रदान सोहळा

सातारा : ‘देशाच्या वाढत्या आर्थिक स्तरासाठी विद्यमान सरकारने तातडीने काही ठोस आणि योग्य निर्णय घेतले पाहिजेत. तरच देशातील दोन राहणीमानातील दरी कमी होऊन चांगला विकास साधता येईल. तसेच सध्या गाजत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जरी पूर्ण कर्जे माफकरता आली नाहीत तरी काही मदत देऊन कर्जात काही प्रमाणात सूट देत पर्याय द्यावा,’ असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर पद्मविभूषण डॉ. सी. रंगराजन यांनी व्यक्त केले. सातारा येथील कै. वा. ग. तथा अण्णासाहेब चिमुले चॅरिटेबल ट्रस्टतर्फेदिला जाणारा मानाचा ‘वा. ग. चिरमुले’ पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर पद्मविभूषण डॉ. सी. रंगराजन यांना येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या सभाहगृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील तसेच विश्वस्त अरुण गोडबोले, श्रीकांत जोशी, अर्थतज्ज्ञ पी. एन. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. रंगराजन यांनी ‘स्पीडिंग अप इकॉनॉमिक ग्रोथ’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. रंगराजन म्हणाले, ‘मी हा चिरमुले पुरस्कार मोठ्या आनंदाने स्वीकारत आहे. देशाला ललामभूत ठरणाऱ्या आणि २० व्या शतकाच्या प्रारंभी बँका आणि विमा क्षेत्रात अशा संस्था सुरू करणे, वाढवणे ही खरोखरच गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याला मी आदरांजली वाहतो. २०१४ ते २०१५ सालापासून ढासळत जाणार ग्रोथ रेट कमी करण्यासाठी नियोजनपूर्वक गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.’ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘डॉ. रंगराजन यांची पुरस्कारासाठी निवड ही अचूक असून, हा १९ वा पुरस्कार प्रदान करताना मला मोठा आनंद वाटतो आहे. रंगराजन यांच्यासोबत मला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली आहे.’ मद्रास स्कूलआॅफ इकॉनॉमिस्टचे स्वामीनाथन, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, आ. आनंदराव पाटील, उदाजीराव निकम, विश्वास दांडेकर, प्राचार्य रमणलाल शहा, सुभाषराव जोशी, डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. गणेश ठाकूर, दिलीप पाठक, अजित मुथा, अनील काटदरे उपस्थित होते. मनसी माचवे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त श्रीकांत जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)