शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळण्यासाठी भाजपला सत्ता द्या

By admin | Updated: January 11, 2017 23:47 IST

चंद्रकांत पाटील : चिंंचणीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक

देवराष्ट्रे : आमदारकीपेक्षा जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत महत्त्वाची आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य सरकारचा निधी थेट मिळणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. विकास करण्यासाठी निधी पाहिजे असल्यास जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.चिंचणी (ता. कडेगाव) येथे देवराष्ट्रे जि. प. गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, संपर्कप्रमुख मकरंद देशपांडे, कृष्णा कारखान्याचे संचालक पांडुरंग मोहिते, राजाराम गरूड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पाटील यांनी केंद्रीय योजना थेट ग्रामपंचायतीला, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमदार होण्यापेक्षा ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यातच खरी मजा असल्याचेही त्यांनी सांगितले. तलाठी, मंडल अधिकारी यांच्या त्रासापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुक्त करण्यासााठी राज्य शासनाने सात-बारा संगणकीकृत करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यानुसार बुधवारीच वर्धा आणि नाशिक या दोन जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ केला असल्याचेही सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, कदम यांच्याकडे विधानसभा व विधानपरिषदेची आमदारकी आहे. पण लोकांची कामे करताना चेहरे बघून के ली जातात. विकास पाहिजे असल्यास भाजपच्या हाती सत्ता द्या. कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी तालुका अध्यक्ष हिम्मत देशमुख, सुरेश यादव, धोंडीराम महिंद, माणिक मोरे, तानाजी महिंद, दशरथ भोंगाळे, पांडुरंग जमदाडे, पपिता सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अ‍ॅड. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)