शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डेत रोटरमध्ये सापडून बालिका ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:26 IST

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील श्रद्धा कुंडलिक पाटील (वय ८ वर्षे) या बालिकेचा ट्रॅक्टरमधून हात सुटून खाली पडल्याने रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.श्रद्धाचे मूळ गाव ...

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील श्रद्धा कुंडलिक पाटील (वय ८ वर्षे) या बालिकेचा ट्रॅक्टरमधून हात सुटून खाली पडल्याने रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.श्रद्धाचे मूळ गाव वायफळे आहे. मात्र आई व आपल्या सात वर्षाच्या लहान भावासोबत ती मामाच्या गावी सावर्डे येथे राहते. ती दुसरीत शिकते. तालुक्यातील कौलगे येथील दिलीप मंडले यांच्याशी या कुटुंबीयांची ओळख होती. मंडले यांचा ट्रॅक्टर आहे. बुधवारी ते सावर्डे येथील यल्लमा मंदिराजवळ एका शेतात रोटर मारण्यासाठी निघाले होते. श्रद्धाचे घर या रस्त्यालगतच आहे. यावेळी दिलीप यांनी त्यांच्या घरासमोर ट्रॅक्टर थांबवला. यावेळी श्रद्धाने आपल्या लहान भावासह ट्रॅक्टरमध्ये बसवण्याचा हट्ट धरला. दोघेही ट्रॅक्टरमध्ये चालकाच्या दोन्ही बाजूला धरून बसले. एका शेतात रोटरचे काम संपले. यानंतर दिलीप यांनी दुसऱ्या शेतात काम सुरू केले. यावेळी अचानक श्रद्धाचा ट्रॅक्टरला पकडलेला हात निसटला व ती खाली पडली.रोटर चालू असल्याने ट्रॅक्टरला गती होती. काही कळण्यापूर्वीच ती रोटरमध्ये सापडली. रोटर फिरल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी हृदय हेलावून टाकणारे दृश्य होते. घटनेची माहिती मिळताच आईसह तिच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रात्री उशिरा याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली.