शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गिरजवडे प्रकल्प ठरणार शेतीला वरदान

By admin | Updated: August 31, 2014 23:35 IST

नागरिकांत समाधान : शिराळा तालुक्यातील ३५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

शिराळा : गिरजवडे लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. ३५० हेक्टर शेतीचे क्षेत्र पाण्याखाली येऊन शेती हिरवीगार होणार आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेसह अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या गिरजवडे प्रकल्पाची उभारणी सत्यात उतरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. शिराळा तालुक्याचा उत्तर भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे येथील बहुतांशी मंडळी नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबई आदी शहरात आहेत. उन्हाळ्यात होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई संपावी, पाण्याविना वाळणारी पिके कायम हिरवीगार दिसावीत, येथील शेती व शेतकरी समृद्ध व्हावा, कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचवावा यादृष्टीने येथे पाणी येणे महत्त्वाचे होते. वाकुर्डे योजनेस निधी मिळाल्याने वारणेचे पाणी उत्तर भागात आले. वाकुर्डे ते रेड व बादेवाडी ते बिऊर कालव्याची कामे झाली. हात्तेगाव व खिरवडे पंपहाऊस कार्यान्वित करून वारणेचे पाणी वाकुर्डेच्या करमजाई तलावात आले. आज या पाण्याचा लाभ वाकुर्डे ते मांगलेपर्यंतच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी घेत आहेत. वाकुर्डे योजनेशिवाय उत्तर भागातील गिरजवडे व परिसरातील अनेक गावांना वरदान ठरणारा गिरजवडे लघु पाटबंधारे प्रकल्प या भागातील महत्त्वाचा प्रश्न होता. अनेक वर्षांपासून रखडलेल्या गिरजवडे प्रकल्पाची उभारणीसाठी २२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रारंभाचा कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता गिरजवडे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीस सुरुवातही झाली आहे. गिरजवडे प्रकल्पाखाली ६.३२ चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र आहे. एकूण लांबी ६७५ मीटर, तर उंची २६.८५ मीटर आहे. १०८.५८ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होणार आहे. लाभक्षेत्रातील गावात ३५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. अनेक विहिरींना पाण्याचा उद्भव निर्माण होणार आहे. भविष्यात या भागात कारखाने, उद्योगांची उभारणी झाल्यास त्यांना पाणी देता यावे, यासाठी ३०७.५० सहस्र घनमीटर पाण्याची तरतूद आहे. (वार्ताहर)