शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या जिराफ थिएटर्सने पटकाविला जयंत करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत जिराफ थिएटर्स ...

इस्लामपूर : राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत जिराफ थिएटर्स ठाण्याच्या ‘स्टार’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत मानाच्या जयंत करंडकावर आपले नाव कोरले. या संघाला २५ हजार रुपये रोख, जयंत करंडक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परिवर्तन नाट्य संस्था, कोल्हापूरच्या ‘जंगल जंगल बटा चला है’ ही एकांकिका द्वितीय आली.

येथील राजारामबापू नाट्यगृहात गेल्या तीन दिवसांपासून ही स्पर्धा सुरू होती. जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा सलग २१ व्यावर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राज्यातील २८ संघांनी सहभागी नोंदविला होता. कोल्हापूरच्या परिवर्तनला २० हजार रुपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी समांतर सांगलीच्या ‘समांतर’ एकांकिकेस १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.

पहिलं प्रोडॅक्शन अहमदनगरच्या ‘पीसीओ’, आमचे आम्ही पुण्याच्या ‘लव्ह इन रिलेशनशिप’ आणि गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या ‘काय राव’ या एकांकिकांना ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्थानिक पातळीवर इस्लामपूूरच्या नागदेवता ग्रुपच्या ‘फुंकर’या एकांकिकेस गौरविण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकामध्ये दिग्दर्शनासाठी बॉबी ठाणे यांना प्रथम, किरणसिंह चव्हाण परिवर्तन, कोल्हापूूर यांना द्वितीय, तर समांतर सांगलीच्या धनश्री गाडगीळ यांना तृतीय क्रमांक मिळाला. ठाण्याच्या अनिल आव्हाड यांनी पुरुष अभियानात बाजी मारली, तर सांगलीच्या धनश्री गाडगीळ यांनी स्त्री अभिनयावर आपली मुद्रा उमटवली. मयुरेश पाटील, निहाल रोकडीकर, अक्षता ताले, मेघना होशिंग यांनी चमक दाखविली. इस्लामपूरच्या अस्मिता खटावकरना ‘फुंकर’साठी स्त्री अभियानाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, श्रीमती कल्पना कुंभार, दया एकसंबेकर, शिवाणी घाटगे, डॉ. विलास आफळे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विश्वास पांगारकर (पुणे), श्रीनिवास एकसंबेकर (कऱ्हाड), प्रा. डॉ. सूरज चौगुले (इस्लामपूर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षा वृषाली आफळे, कार्यवाह प्रा. डॉ. संदीप पाटील, रोझा किणीकर, प्रकाश जाधव, रज्जाक मुल्ला, गायत्री खैर, अज्ञेय पाटील, राहुल पवार, अक्षय कुलकर्णी, डॉ. अतुल मोरे, शशिकांत कुलकर्णी, दिलीप सुतार, डॉ. नीलम शहा, रवी बावडेकर, मंगल देसावळे, शुभम कर्णे, विनय महाडिक, योगीता माळी उपस्थित होत्या.

फोटो -१६०२२०२१-आयएसएलएम- जयंत करंडक न्यूज

इस्लामपूर येथील राज्यस्तरीय जयंत करंडक एकांकिका स्पर्धेतील उपविजेत्या परिवर्तन कोल्हापूरच्या संघास प्रा. शामराव पाटील, कल्पना कुंभार यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी दया एकसंबेकर, शिवाणी घाटगे, वृषाली आफळे, रोझा किणीकर, डॉ. सूरज चौगुले, प्रा. प्रकाश जाधव, प्रा. डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.