शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीचे भूत ग्राहकांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST

सांगली : पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ ग्राहकांची अडचण वाढविणारी ठरत आहे. बाजारपेठेला लागलेली उन्हाळ्याची चाहूल आणि या दरवाढीमुळे ...

सांगली : पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ ग्राहकांची अडचण वाढविणारी ठरत आहे. बाजारपेठेला लागलेली उन्हाळ्याची चाहूल आणि या दरवाढीमुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून स्थिर असलेले धान्य, कडधान्यांच्या दरातही वाढ झालेली आहे.

या सप्ताहात भाजीपाल्याच्या दरात सरासरी १० रुपयांनी वाढ झाली, तर कांदा, बटाटा, लसणाचे वाढलेले दर कायम आहेत. कांदा दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या आठवड्यात फळ मार्केटमध्ये चिकूची चांगली आवक होते आहे. तर संत्र्यांची आवक थोडी कमी होत आहे. कलिंगड आणि चिकूची आवक अशीच वाढत राहण्याचा अंदाज आहे.

किराणा मालाच्या दरात कधी नव्हे ती स्थिरता आली होती. त्यातही आता वाढ होत आहे. खाद्यतेलाचे दर स्थिर असले तरी किराणाचे इतर जिन्नस महागले आहेत.

चौकट

चिकूची आवक वाढतेय

फळ बाजारात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र आहे. कलिंगडसह या आठवड्यापासून चिकूचीही आवक वाढत आहे. सध्या स्थानिक शेतकऱ्यांसह बाहेरील चिकूची आवक वाढत असली तरी दरही प्रतिकिलो ३० ते ५० रुपयांपर्यंत स्थिर आहेत.

चौकट

मसाल्याच्या पदार्थांचे दर वाढले

किराणा बाजारपेठेत या आठवड्यात दरातील चढ-उतार कायम आहे. त्यातही मसाल्याच्या पदार्थांचे दर मात्र २० रुपयांनी वाढले आहेत. अशीच वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

चौकट

गवारी, भेंडी दराचा तोरा

भाजीपाला दरातील वाढ कायम राहताना, करडईसारख्या पालेभाज्यांची आवक घटली आहे; तर फळभाज्यांच्या दरात सरासरी १५ रुपयांनी वाढ झाली आहे. ढबू मिरचीच्या दरात वाढ होत ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने ती मिळत आहे.

कोट

दरातील वाढ आणि ग्राहकांचा प्रतिसाद दोन्हीही कायम आहे. सध्या काहीप्रमाणात लग्नासह सार्वजनिक कार्यक्रम सुरू असल्याने खरेदी समाधानकारक आहे.

अजित पाटील, किराणा दुकानदार

कोट

जिथे जाईल तिथे दरवाढ, मध्यमवर्गीयांनी करायचे काय. शासनाकडून किमान ज्याच्या दरावर नियंत्रण ठेवता येते, त्यावर तरी नियंत्रण ठेवून दिलासा द्यावा.

कमल भोसले, गृहिणी

कोट

या आठवड्यात जिल्ह्यासह कर्नाटकातूनही चिकूची आवक वाढत आहे. ग्राहकही त्यास प्रतिसाद देत आहेत. यापुढे महिनाभर अशीच आवक राहणार आहे.

बाळासाहेब चव्हाण, व्यापारी