शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रांती’चे घाेगाव गट कार्यालय पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

अपवादवगळता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफआरपी ...

अपवादवगळता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफआरपी न दिल्याच्या निषेधार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा घडला. आगीत कार्यालयातील कागदपत्रे व फर्निचर जळाले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी एकरकमी एफआरपी द्यायचे कबूल केले होते. मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी ‘शब्द’ पाळला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी, असा आग्रह धरला होता. यासाठी जिल्ह्यात आंदोलनेही झाली. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केल्यानंतर हंगामाला सुरुवात झाली. मात्र, हंगाम सुरू होऊन अडीच-तीन महिने उलटले तरी, अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांना इशारा दिला होता. त्यानंतरही अपवादवगळता इतर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. वेळेत एफआरपी मिळत नसल्याने अखेर संघटनेने कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. येणाऱ्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.