लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाची साथ पूर्णत: संपली नसली तरी व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु आहेत. या स्थितीत लोकांना प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासचा पर्याय शासनाने दिला आहे. तो मिळविण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्जाद्वारे तो मिळू शकतो. रेल्वेतून प्रवास, मॉलमध्ये प्रवेश आदींसाठी तो गरजेचा आणि उपयुक्त आहे. विमानातून प्रवास करण्यासाठी तो आधारभूत ठरेल.
बॉक्स
पासची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत
पास काढण्याची प्रक्रिया अतिशय सुटसुटीत आहे. स्वत:चा सेल्फी काढूनही त्यासाठीचा फोटो अपलोड करता येतो. पासची छापील प्रत किंवा मोबाईलमधील छायाचित्र दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे. मात्र, हा पास मिळविण्यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस चालतील.
दोन्ही डोस घेतलेले किती?
फ्रन्टलाईन वर्कर्स १६,१०४
आरोग्य कर्मचारी १७,८११
१८ ते ४५ वयोगट ३६,१३५
४६ ते ६० वयोगट २,०३,८४२
६१पेक्षा जास्त वयाचे १,८३,४५४
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण १४.८९ टक्के