शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीशी गट्टी, उपमहापौर गटाची सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 00:42 IST

प्रभाग समिती सभापती निवड : बाळासाहेब काकडे, कांचन भंडारे, हसीना नायकवडी यांची बिनविरोध निवड

सांगली : महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत शनिवारी सत्ताधारी काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेऊन तीन सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध केल्या. उर्वरीत एक जागाही बिनविरोध होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. उपमहापौर गटाला डच्चू देऊन पदाधिकाऱ्यांच्या गटाने राष्ट्रवादीला जवळ करण्याची केलेली खेळी महापालिकेत आता वेगळ््या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील एकूण चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शनिवारी अंतिम मुदत होती. प्रभाग समिती क्र. १ च्या सभापतीपदी सत्ताधारी गटाचे बाळासाहेब काकडे, प्रभाग तीनच्या सभापतीपदी राष्ट्रवादी गटाच्या कांचन भंडारे आणि प्रभाग समिती ४ च्या सभापतिपदी काँग्रेसच्या हसीना इलियास नायकवडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग समिती क्र. २ च्या सभापतिपदासाठी काँग्रेसच्या मृणाल पाटील व राष्ट्रवादीचे युवराज गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्हीपैकी गायकवाड यांचा अर्ज मागे घेण्याची विनंती सत्ताधारी गटाने केली आहे. राष्ट्रवादीनेही त्यासाठी प्राथमिक तयारी दर्शविल्याने हीसुद्धा जागा बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी आघाडी व राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका गटनेते किशोर जामदार यांनी मांडली आणि त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. उपमहापौर विजय घाडगे गटाला डावलण्याचे राजकारण यामागे होते. राष्ट्रवादीच्यावतीने प्रभाग समिती क्र. ३ च्या सभापतिपदासाठी कांचन भंडारे यांचे नाव निश्चित केल्यानंतर स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांनी त्याला विरोध केला. भंडारे यांना उमेदवारी न देण्याचा आग्रह त्यांनी केला. किशोर जामदार यांनी त्यांची ही मागणी धुडकावली. प्रभाग समिती २ साठी स्वाभिमानी आघाडीने उमेदवार द्यावा, असे सूचविले. भंडारे यांच्या उमेदवारीनंतर स्वाभिमानी आघाडी नाराज झाली आणि त्यांनी निवड प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रभाग समिती क्र. २ च्या पदासाठीही जामदार यांनी राष्ट्रवादीला आणखी एक अर्ज दाखल करण्यास सांगितले. उपमहापौर गटाला डावलण्यासाठीच पदाधिकाऱ्यांच्या गटाचे राजकारण अखेर यशस्वी झाले. (प्रतिनिधी)