शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळगावमधील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात

By admin | Updated: January 9, 2015 00:11 IST

वैद्यकीय पथकाकडून पाहणी : आठ नवीन रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रातून उपचार

सोनी/तासगाव : धुळगाव (ता. तासगाव) येथे दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची साथ आली असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, आज (गुरुवारी) दिवसभरात नवीन रुग्ण आढळून आला नसून, सध्या साथ आटोक्यात आली आहे. सायंकाळपर्यंत आठ नवीन रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रातून उपचार करण्यात आले. साथ नियंत्रणात आली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.धुळगाव येथे दोन दिवसांपासून जुलाब, उलटी व तापाचा अचानक त्रास होऊ लागल्याने व ही सर्व लक्षणे गॅस्ट्रोची असल्याने वैद्यकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली होती. सांगली-मिरजेसारखी स्थिती येथे होऊ नये म्हणून मोठ्याप्रमाणात काम चालू केले होते.शंभरावर ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णांच्या घरीच उपचार सुरू होते. तातडीने उपचार झाल्याने लागण झालेल्या रुग्णांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होऊन साथ आटोक्यात आली आहे. नवीन रुग्ण आढळला नसला तरी, गावामध्ये सर्वांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे गावाच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी, प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. आज दुपारी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती गजानन कोठावळे, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली .सरपंच जाफर मुजावर यांनी सांगितले की, गाव पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे पाणी दूषित नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे पाणी दूषित आल्याने साथ पसरली आहे. प्रादेशिकची जलवाहिनी बदलण्याची मागणी करणार आहे. (वार्ताहर)मुख्य जलवाहिनीला गळती२४ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी बंद होते. यादरम्यान विहिरीतून पाणी पुरवठा सुरु केला होता. दि. ४ पासून प्रादेशिक योजना पूर्ववत सुरू झाली. या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती असल्यामुळे व पूर्वीचे शिल्लक पाणी बाहेर जाऊ न देता थेट लोकांपर्यंत गेल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा झाला.गावात सध्या जिल्हास्तरीय वैद्यकीय पथकाने तळ ठोकला असून, गळती शोधण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. आरोग्य विभागाच्या सहा कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. गावात सर्वत्र पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात येत आहे.