शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर स्फोटात मुलगा ठार

By admin | Updated: April 9, 2017 23:32 IST

सोनलगी येथील दुर्घटना; एक गंभीर जखमी; सलग दुसऱ्या दिवशी स्फोटाची घटना

उमदी : सोनलगी (ता. जत) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चौदा वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला, तर त्याची आई गंभीररीत्या जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. कामेश तुकाराम कोळी यांच्या मालकीचे घर व पंक्चरचे दुकान सोनलगी येथील मध्यवर्ती ठिकाणी आंबेडकरनगर येथे आहे. पत्नी व दोन मुलांसह ते या ठिकाणी राहतात. रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्यांचा मुलगा अभिषेक (वय १४) हा जागीच ठार झाला, तर पत्नी रेखा (३५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांंना उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गॅसच्या स्फोटानंतर घरातील प्रापंचिक व व्यावसायिक साहित्य जळून खाक झाले आहे. स्फोटावेळी धुराचे लोट घरातून बाहेर पडत होते. गॅस स्फोटानंतर येथील नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग उशिरापर्यंत आटोक्यात येऊ शकली नाही. त्यातच पाण्याची तीव्र टंचाई असल्याने आग विझविण्यासाठी पाणी मिळविणे अवघड झाले होते. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण सपांगे, तलाठी हिप्परकर, नितीन कुंभार यांनी पंचनामा केला. जळालेल्या मृतदेहाची विच्छेदन तपासणी घटनास्थळीच करण्यात आली व मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शेजारी असलेल्या घरातील रेशनचे गहू, तांदूळ, साखर हे साहित्यही जळून खाक झाले आहे. घटनास्थळी काँग्रेस जि. प. सदस्य विक्रम सावंत व माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, माजी पं. स. सदस्या सुकन्या कांबळे, नूतन पं. स. सदस्या लता कुल्लोळी यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.गॅस सिलिंडरच्या स्फोटाची सोनलगी गावातील ही पहिलीच घटना असून, कामेश कोळी यांचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. त्यांना शासकीय मदत मिळाली पाहिजे, असे मत सरपंच पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.