शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धनगावात घराणेशाही विरुध्द तरुणाई मैदानात

By admin | Updated: October 31, 2015 00:01 IST

गावातील तरुणांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायतीकडून मागविलेली माहिती, लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी, त्यावर दाखल झालेल्या तक्रारी, कारवाईचा बडगा हे प्रचाराचे मुद्दे

शरद जाधव -- भिलवडी--पलूस तालुक्यातील धनगाव (तावदरवाडी) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही जपत गेली पंचवीस वर्षे सत्तेत असणाऱ्या ज्येष्ठ नेतेमंडळींविरोधात तरुण पिढी मैदानात उतरली आहे. सत्ताधारी विरोधात सामान्य जनता, असा रंगतदार सामना होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी सदस्यसंख्या नऊ असून, खुल्या प्रवर्गातील महिला हे सरपंच पदासाठी आरक्षण आहे. धनगाव ग्रामपंचायतीमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. सत्ताधारी गटाचे आठ, तर विरोधकांचा केवळ एक सदस्य आहे. गावातील तरुणांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायतीकडून मागविलेली माहिती, सत्ताधाऱ्यांनी पुरविलेल्या माहितीवरून लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी, त्यावर दाखल झालेल्या तक्रारी, प्रशासनाने उगारलेला कारवाईचा बडगा हे प्रचाराचे मुख्य मुद्दे तरुणांच्या परिवर्तन पॅनेलने पुढे केले आहेत. त्यांनी राजकारणात नवख्या चेहऱ्यांना संधी देत सत्ताधाऱ्यांसमोर पहिल्या टप्प्यातच आव्हान निर्माण केले आहे, तर सत्ताधारी जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने नऊ जागांवर आपले उमेदवार उभारले आहेत. काहींनी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यपदही भोगले आहे. काही ज्येष्ठ मंडळींवर नाईलाजास्तव मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांनी लाखो रुपयांची विकासकामे हा मुद्दा पुढे केला असला तरीही, विरोधकांनी भ्रष्टाचार व पंधरा वर्षातील विकास कामांचा पंचनामा हा मुद्दा पुढे रेटला आहे. याकडे आता लक्ष लागले आहे. (वार्ताहर)शामराव-भीमराव अन् गणप्या गावडे...दोन नंबरच्या प्रभागात शामराव आनंदा साळुंखे व भीमराव आनंदा साळुंखे हे दोन सख्खे भाऊ मैदानात उतरले आहेत. ते नेहमीच परस्पराच्या विरोधात वेगवेगळया निवडणुका लढवितात. भरत जाधव यांचा गाजलेल्या ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ या चित्रपटाची कथा या दोन भावांवरच आधारित होती.