शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’

By admin | Updated: July 6, 2016 00:20 IST

खून का बदला खून : पोलिसांच्या कारवाईला मरगळ आल्याने गुंडांचे फावले

सचिन लाड -- सांगली -‘खून का बदला खून’ आणि ‘वर्चस्व’ या दोन मुद्यांवरून शहरात गेल्या दहा वर्षांत अनेकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. यातून डझनभर गुंडांची ‘गेम’ करण्यात आली. एकापाठोपाठ एक अशा विरोधी टोळीतील गुंडांचा खात्मा करण्याची मालिकाच सुरू आहे. भरदिवसा खून करून हे गुन्हेगार कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सहिसलामत बाहेर येत असल्याने टोळीयुद्ध धगधगतच आहे. गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढता राहिल्याने ‘नाट्यपंढरी’ अशी सांगलीची ओळख लोप पावत आहे.सोमवारी रवींद्र कांबळे या गुंडाचा गोकुळनगरमध्ये भरदिवसा खून झाल्याने शहरातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गुंड अकबर आत्तार, दाद्या सावंत, अजय माने, रफिक शेख, विठ्ठल शिंदे, संजय पोतदार, सोमनाथ सकपाळ, विजय पवार, मिर्झा, अशोक सरगर, रशीद शेख अशा अनेक गुंडांचा टोळीयुद्धातून खात्मा झाल्याचे सांगलीकरांनी पाहिले आहे. एखाद्या घटनेचा अपवाद सोडला, तर बहुतांशी खून भरदिवसा झाले आहेत. प्रत्येकाचा खून करताना दगडाचा वापर करण्यात आला. राजकीय आश्रय, अवैध व्यावसायिकांचे पाठबळ या जोरावर उपनगरांत गुंडांच्या टोळ्या आजही सक्रिय आहेत. ते खिशात किंवा कमरेला नेहमीच हत्यार लावून असतात. शहरात किंवा ते राहात असलेल्या भागात वर्चस्व कोणाचे? या मुद्यावर गुन्हेगारी टोळ्यांचा संघर्ष राहिला आहे. संजयनगर, गोकुळनगर, शंभरफुटी रस्ता, जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर, संपत चौक, अहिल्यानगर, प्रेमनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, शामरावनगर ही ठिकाणे नेहमीच संवेदनशील राहिली आहेत. सातत्याने याठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न व मारामारीच्या घटना घडल्या आहेत.गेल्या दहा वर्षांत टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’ झाली आहे. एक-दोन खुनाचे अपवाद सोडले तर, अन्य गुन्ह्यांतून हे गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. कायद्यातील पळवाटांचा आधार घेणे, पोलिसांच्या निष्क्रियतेचा लाभ घेणे, दहशत माजवून साक्षीदारांवर दबाव आणणे असे प्रकार या टोळ्यांकडून होत आहेत. गुंडाविरुद्ध तक्रार आली तर पोलिसांकडून तातडीने कारवाईची पावले उचलली जात नाहीत. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली जात नाही. त्यांना तपासले जात नाही. परिणामी गल्ली-बोळात नवीन फाळकूट दादा तयार होत आहेत. सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर या पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखा नुसती कागदावरच अस्तित्वात आहे. गुन्हेगारांविरुद्ध त्यांची कारवाई कधीच प्रकर्षाने दिसत नाही. प्रलंबित गुन्ह्यांचाही त्यांना छडा लावता येत नाही. गुन्हेगारांचे डोके पुन्हा वरतत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांचा जिल्ह्यातील तीन वर्षांचा कार्यकाल संघर्षाचा राहिला. गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात त्यांचा हातखंडा होता. कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराची ते नेहमी माहिती ठेवत. त्यांचा गुन्हेगारांवर ‘वॉच’ असे. एखादी तक्रार आली की संबंधित गुंडास तातडीने आत टाकण्याचे आदेश देत. त्यांना घाबरून अनेक टोळ्यांतील गुन्हेगार शांत होते. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने विविध मोहीम राबवत. त्यांची बदली होताच म्हमद्या नदाफसह अनेक टोळ्यांनी डोके वर काढले. सध्याचे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना पदभार घेऊन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यांचीही ‘डॅशिंग’ पोलिसप्रमुख म्हणून ओळख आहे. त्यांनी कारवाईची दिशा यापूर्वीच स्पष्ट केली आहे.