शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

बामणीत मुस्लिम समाजाचा गणेशोत्सव--हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:43 IST

 बाळासाहेब शिंदे/पारे (सांगली) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत बामणी (ता. खानापूर) येथील मुस्लिम समाजाने गणेशोत्सव साजरा करीत नवव्या वर्षीही परंपरा जोपासली आहे. येथील मुस्लिम समाज एकत्रित येऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून दररोज दोनवेळा पूजा-अर्चा करतो. शिवाय गौरी पूजनासह गणेश विसर्जनापूर्वी महापूजाही घातली जाते.बामणी येथील हिंदू-मुस्लिम एकता गणेश मंडळाचे संस्थापक जहॉँगीर शिकलगार ...

ठळक मुद्दे नऊ वर्षांची परंपरा कायमयेथील हिंदू-मुस्लिम समाजाच्या गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशाची महाआरती दोन्ही समाजातील भाविक दररोज नित्यनियमाने करीत असतात.महाआरतीत मुस्लिम आणि हिंदू ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात.विविध स्पर्धाही मुस्लिम समाजातील गणेशभक्त आयोजित करतात.

 

बाळासाहेब शिंदे/पारे (सांगली) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत बामणी (ता. खानापूर) येथील मुस्लिम समाजाने गणेशोत्सव साजरा करीत नवव्या वर्षीही परंपरा जोपासली आहे. येथील मुस्लिम समाज एकत्रित येऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून दररोज दोनवेळा पूजा-अर्चा करतो. शिवाय गौरी पूजनासह गणेश विसर्जनापूर्वी महापूजाही घातली जाते.

बामणी येथील हिंदू-मुस्लिम एकता गणेश मंडळाचे संस्थापक जहॉँगीर शिकलगार यांनी २००८ ला पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लिम गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. मुस्लिम समाजातील भाविकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करतात. दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती, गोड नैवेद्य व दररोज महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर संगीत खुर्ची, गोणपाट उडी, लिंबू-चमचा अशा विविध स्पर्धाही मुस्लिम समाजातील गणेशभक्त आयोजित करतात.

हा गणेशोत्सव तालुक्यात आदर्शवत ठरत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. बामणीतील ग्रामस्थही मुस्लिम समाजाच्या सणात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. महाआरतीत मुस्लिम आणि हिंदू ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात.गणेश विसर्जनापूर्वी महापूजा आयोजित केली जाते.

मंडळाचे संस्थापक जहॉँगीर शिकलगार असून, खलील शिकलगार, हारुण शिकलगार, शकील शिकलगार, चंदन शिकलगार, गणी शिकलगार, सूरज शिकलगार, युनूस मुलाणी, जुबेर मुलाणी, आरफान शिकलगार, इरफान शिकलगार, हसन शिकलगार, प्रशांत माने, सतीश माळी, सुखदेव शिंदे, कुणाल शिंदे, ऋषी जगताप, राजू शिकलगार, बशीर मुलाणी, मलिक मुलाणी, ईलाही शिकलगार, अरमान शिकलगार, अमीर शिकलगार, समीर शिकलगार व वसीम मुलाणी आदी कार्यकर्ते सहभागी होतात.