शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुशोभिकरणासाठी नेत्यांची गांधीगिरी

By admin | Updated: December 7, 2015 00:19 IST

आंबेडकर पुतळा : गुलाब देऊन पदाधिकाऱ्यांचे स्वागत

अशोक पाटील--इस्लामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण होण्यासाठी दलित नेते, विविध संघटनांनी आंदोलने, निवेदने दिली आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेत्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत पालिका पदाधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन हे काम १४ एप्रिल २०१६ पर्यंत (डॉ. आंबेडकर यांची १४५ वी जयंती) पूर्ण करावे, अशी विनंती केली.इस्लामपुरात नगरपरिषदेच्या फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी शहरातील दलित नेत्यांनी आंदोलने, निवेदने आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. तहसील कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीपासून ते परिसराच्या सुशोभिकरणासाठी अनेक अडचणी आल्या आहेत. सध्या हे काम संथगतीने सुरु आहे. हे काम जलद होण्यासाठी शहरातीलच काही नेत्यांनी आंदोलने केली. परंतु पालिका प्रशासनाने त्याची कधीही गंभीर दखल घेतली नाही. कधी ठेकेदार नाही, तर कधी सुशोभिकरणासाठी लागणारे साहित्य नाही, तर कधी निधी नाही, अशी कारणे देऊन हे काम दिवसेंदिवस रखडत ठेवले आहे.ज्या दलित नेत्यांनी यासाठी आंदोलने केली, त्यातील काही दलित नेते बदनामीच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे शहरातील दलित नेते आणि चळवळ थंडावली आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामपूर शहर राष्ट्रवादी पार्टीचे सदस्य महेश परांजपे यांनी आंबेडकरपे्रमी युवकांना सोबत घेऊन गावातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढून पुतळा परिसर सुशोभिकरणाचा मुद्दा उचलून धरला होता.रविवार, दि. ६ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. दिनेश येडेकर, प्रकाश कांबळे, अजित पन्हाळे, प्रकाश एटम, संजय बनसोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांची उपस्थिती होती, तर पालिकेचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि इतर नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. यावेळी दलित नेत्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत उपस्थित पालिका पदाधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १४५ वी जयंती साजरी होत आहे. तोपर्यंत तरी सुशोभिकरणाचे काम पूर्ण करावे, अशी विनंती केली.पुतळा सुशोभिकरणासाठी ६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी लागणारा दगड मध्यप्रदेशातून आणावा लागणार आहे. मध्यंतरी या कामासाठी लागणारा निधी पालिकेकडे उपलब्ध नाही. सध्या पालिकेकडे निधी असला तरी, साहित्य उपलब्ध होत नसल्याने काम रखडले आहे. काही महिन्यात हे काम पूर्ण करू.- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपरिषद.