शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जी. एम. बियाणाला विरोध करणारे औषध कंपन्यांचे एजंट

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

सुरेश पाटील, अजित नरदे : सांगलीत गुरुवारी शेतकरी परिषद

सांगली : दुष्काळ आणि औषध, रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यासाठी केंद्र शासनाने जनुक बदललेले (जी. एम.) बियाणे लागवडीस परवानगी दिली पाहिजे. भारतामध्ये काही ठराविक बड्या औषध कंपन्यांच्या हितासाठी जनुकसंस्कारित लागवडीवर बंदी घातली आहे, अशी टीका राज्यव्यापी शेतकरी परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश पाटील व शेतकरी संघटनेचे अजित नरदे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रश्नावर आदगोंडा बाबगोंडा पाटील कृषी प्रबोधन मंचतर्फे गुरुवार, दि. १ रोजी सांगलीत सकाळी १० वाजता शेतकरी परिषद आयोजित केली आहे. खासदार आणि कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतीचे उत्पादन वाढले तर, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकरी सध्या जे बियाणे वापरत आहे, ते कालबाह्य झाले आहे. सध्या वापरत असलेल्या बियाणांमुळे एकरी दहा ते बारा टन मका बियाणाचे उत्पादन होत आहे. परंतु, जनुकसंस्कारित बियाणांचा वापर केल्यास एकरी तीस ते चाळीस टन उत्पादन मिळणार आहे. दर कमी मिळाला तरीही उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा कमी होणार आहे. बीटी कापूस बियाणाची भारतात लागवड होत असून, त्यावर किडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे कीटकनाशक औषध फवारणीचा खर्च ८० टक्के वाचला आहे. बीटी वांगी, मका, ज्वारी, गहू, टोमॅटो, बटाटे या पिकांमध्ये जनुकसंस्कारिताचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उत्पादनही वाढल्याचे सिध्द झाले आहे. ते म्हणाले की, हा भाजीपाला व अन्न खाल्ल्यामुळे माणसाला कोणताही धोका नसल्याचे जगातील ११० नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे. अनेक राष्ट्रांमध्ये आणि विशेषत: अमेरिकेमध्येही जनुकसंस्कारित बियाणांचा वापर करून शेती केली जात आहे. कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनुकसंस्कारित पिकांच्या व्यावसायिक लागवडीस विरोध केला आहे. (प्रतिनिधी) लोकसभेत आवाज उठविण्याची मागणी जी. एम. बियाणाचा वापर करण्यासाठी खासदार राजू शेट्टी, खासदार संजयकाका पाटील, खा. धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आवाज उठवावा, अशी मागणी परिषदेत करणार आहे. यासाठी तीनही खासदारांना शेतकरी परिषदेला बोलाविले आहे. याशिवाय, पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार, अजित नरदे, डॉ. पारखी, विजय निवळ हे कृषितज्ज्ञ शेतकरी परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.