शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या विकासासाठी भविष्याचा विचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

इस्लामपूर : गावांची वाढ झपाट्याने होत असून त्यातून नवनवीन प्रश्नही समोर येत आहेत. आता गावात विकासकामे करताना पुढील २५-३० ...

इस्लामपूर : गावांची वाढ झपाट्याने होत असून त्यातून नवनवीन प्रश्नही समोर येत आहेत. आता गावात विकासकामे करताना पुढील २५-३० वर्षांचा विचार करून विकासकामे करावी लागतील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले.

साखराळे (ता. वाळवा) येथे ९२ लाख रुपयांच्या सहा रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्या रंजना माने, आनंदराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, या परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या संधीचा लाभ जनतेला करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळा अद्ययावत करीत आहोत. रेशन कार्डाचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅम्प घेतले. जातीचे दाखले व आता जात पडताळणीचे दाखले शाळेत देण्याची व्यवस्था केली आहे. धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. वाकुर्डे बुद्रुक २ चे पाणी तालुक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर नवा सभा मंडप बांधून विरंगुळा केंद्रही करू.

सरपंच बाबूराव पाटील यांनी स्वागत केले. शिवाजी डांगे, राजेंद्र पाटील, अविनाश पाटील, दिनकर धोंडी पाटील, सुबराव डांगे, आनंदराव दवणे, विश्वास माने, प्रताप पाटील, शैलेंद्र सूर्यवंशी, बळवंत माने, वंदना पाटील, अलका माने, एस. व्ही. पाटील उपस्थित होते. उपसरपंच तजमूल चौगुले यांनी आभार मानले.

फोटो : ०५ इस्लामपूर ३

ओळ : साखराळे (ता. वाळवा) येथे रस्त्याच्या कामाचा प्रारंभ जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, रंजना माने, बाबूराव पाटील, तजमूल चौगुले उपस्थित होते.