शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

सिंचन योजनांचे भवितव्य अंधारात

By admin | Updated: March 1, 2015 23:17 IST

प्रतीक पाटील : विभागवार नियोजनाचा फटका बसण्याची चिन्हे

सांगली : वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी विभागांमध्ये भेदभाव केला नाही. जेवढी कामे पश्चिम महाराष्ट्रात केली, तेवढीच विदर्भ व अन्य विभागात केली. मात्र, सध्या विदर्भावर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांचे भवितव्य अडचणीत येईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, टेंभू आणि म्हैसाळ या दोन्ही योजनांना नव्या सरकारच्या कालावधीतील धोरणांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. या योजना किमान पाच वर्षे तरी चालू ठेवाव्या लागतील. पाच वर्षानंतर आमचे सरकार आले, तर पुन्हा त्यांना चालना मिळू शकते. सध्याच्या परिस्थितीत सिंचन योजनांसाठी राज्यातील राजकीय वातावरणाशी, अनुशेषाच्या प्रश्नाशी आणि केंद्र शासनाशी अशा तिन्ही पातळ्यांवर संघर्ष करावा लागेल. या योजना साखर कारखान्यांमार्फत चालविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याबाबतचा विचार आणि कृती होणे महत्त्वाचे आहे. ‘आधी पैसे भरा आणि मग योजनांचा लाभ घ्या’, अशाप्रकारचे धोरण सध्याच्या सरकारचे दिसत आहे. आघाडी सरकारने टंचाईतून वीज बिले भागवून योजना कार्यान्वित केल्या होत्या. अशी तत्परता दिसत नाही. केंद्र शासनाच्या कारभाराबाबत ते म्हणाले की, भाजपकडून लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. काँग्रेस सरकारच्या अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले. भाजपचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यानंतर त्यांनी, घोटाळे केलेल्यांवर गुन्हे दाखल करायला हवे होते. त्यांनी ते केले नाहीत. घोटाळ्यांचा गाजावाजा झाला. पण प्रत्यक्षात घोटाळेच झाले नसल्याने भाजप सरकार याबाबत काही करू शकलेले नाही. काळ्या पैशाबाबतही ते असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे लोकांनाच आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे असूनही जिल्ह्यातील आमदार व खासदारांना जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांसाठी व अन्य कामांसाठी निधी मिळविण्यात अपयश आले आहे. (प्रतिनिधी)आस्था पाहू...वसंतदादा स्मारकाबाबत ते म्हणाले की, आमच्या सरकारच्या कालावधीतही काही चुका झाल्या आहेत. वसंतदादा स्मारक वेळेत पूर्ण होणे आवश्यक होते. आता नव्या सरकारला वसंतदादांबद्दल आस्था आहे का ते पाहू.