शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महापालिकेमध्ये निधीचा खेळखंडोबा

By admin | Updated: January 4, 2016 00:38 IST

महापौरांनी तेराव्या वित्त आयोगाचा चौथा ठराव प्रशासनाकडे पाठविल्याने खळबळ उडाली.

सांगली : महापालिकेला राज्य शासनाकडून प्राप्त १३ व्या व १४ व्या वित्त आयोगातील २४ कोटी रुपयांच्या निधीचा खेळखंडोबा झाला आहे. महासभेत निधी वाटपाचा ठराव होतो, नंतर त्यावर वाद होतो, तो ठराव रद्दही केला जातो. कालांतराने कोणतीही चर्चा न होताच प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी ठराव पाठविले जातात. सत्ताधारी काँग्रेसमधील मतभेदाचा हा सारा परिपाक आहे. आता तर तेराव्या वित्त आयोगाचा चौथा ठराव केला आहे. त्यालाही वादाचे ग्रहण लागले आहे. तिजोरीत पैसे असूनही खर्च करण्याची दानतच महापालिकेत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तेराव्या वित्त आयोगातून पालिकेला ७ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. नोव्हेंबर महिन्यात निधीवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून निधी वाटपाचा निर्णय झाला. हा संघर्ष थंडावतो, तोच महापौरांनी तेराव्या वित्त आयोगाचा चौथा ठराव प्रशासनाकडे पाठविल्याने खळबळ उडाली. याला स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यातून महापौरांनी सुचविलेली सव्वा कोटीची कामे कायम ठेवून उर्वरित एक कोटीची कामे बदलण्यावर एकमत झाले आहे. या एक कोटीच्या कामात काही पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील कामांचाही समावेश आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांकडून कामे बदलण्यास विरोध होणार आहे. (प्रतिनिधी)नागरिकांत नाराजीचा सूरदैेव देते आणि कर्म नेते, अशी म्हण आहे. त्याची प्रचिती वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून येते. शासनाने कोट्यवधीचा निधी दिला आहे. पैसे तिजोरीत आहेत. पण खर्च करण्याच्या वादातून हा निधी तसाच पडून आहे. एकीकडे सांगलीची जनता मूलभूत सोयी-सुविधांसाठी टाहो फोडत आहे. महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.