शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी अडचणीची, तरीही द्यावी लागेल

By admin | Updated: January 12, 2015 01:29 IST

चंद्रकांत पाटील : केंद्र व राज्य शासनाकडून कारखान्यांना मदत देण्याची ग्वाही

सांगली : जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर ९०० रुपयांनी पडले असल्याने कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देता येणे शक्य नसले तरीही कारखानदारांनी स्वत:चा घरचा व्यवसाय समजून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिला पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कारखानदारांना शक्य ती मदत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि चंद्रकांत पाटील यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील. परंतु त्यासाठी काही कालावधी लागेल. सतरा वर्षातील प्रश्न सत्तर दिवसातच सुटावेत अशी अनेकांची अपेक्षा आहे. कारखानदारांनी सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करु नये. आम्ही दिलेल्या आश्वासनांना जागणार आहोत. एलबीटी हटविण्यात येणार आहे. टोलमुक्त महाराष्ट्र हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत सरकारची आर्थिक ओढाताण आहे. त्यानंतर काही चमत्कार होतील असे निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. आ. गाडगीळ म्हणाले, अडीच महिन्याच्या कालावधित शहर विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. सांगली हा तालुका व्हावा, हरिपूरला भक्त निवासाची निर्मिती व्हावी, विकास आराखडा मंजूर करावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. एलबीटीच्या अटी जाचक असल्याची मला व्यापारी म्हणून कल्पना आहे. जीएसटी कायदा मंजूर झाल्यावर निश्चितपणे एलबीटी रद्द होईल. सांगली शहराच्या विकासासाठी मार्चअखेरकरिता २ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, माजी आ. अजितराव घोरपडे, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, दीपक शिंदे, गोपीचंद पडळकर, दिलीप सूर्यवंशी, प्रकाश बिरजे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)