शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:10 IST

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान ...

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान वेतन लागू करावे, पगारामधील त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन जात कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली.आयटकचे रमेश सहस्रबुध्दे म्हणाले, प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कर्मचाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांत अस्वस्थता आहे. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेतही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.यावेळी संघटनेच्या इतर पदाधिकाºयांनीही मनोगत व्यक्त करत, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात किमान वेतनची अंमलबजावणी करा, पगारातील गैरसमज काढण्यासाठी बैठक बोलवावी, भविष्य निर्वाह निधी न भरणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, सेवा पुस्तके अद्ययावतपणे भरून द्यावीत, कर्मचाºयांना ओळखपत्र मिळावीत, कर्मचाºयांचा वर्ग तीन व चारमध्ये समावेश करावा, वेतनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, निवृत्तीवेतन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब झुरे, सचिव अ‍ॅड. राहुल जाधव, ए. के. कुलकर्णी, यल्लाप्पा कोळी, किरण आरते, संतोष मुळीक, पांडुरंग पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.