शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात हमीभावासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:07 IST

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह ...

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिला.वाळवा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयासमोर आला. तेथे जाहीर सभा झाली. सभेनंतर तहसील कार्यालयाच्या आवारात सोयाबीन ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. तहसीलदार नागेश पाटील यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.संग्रामसिंह पाटील म्हणाले, मुबलक पाणी असतानाही विजेचे लोडशेडिंग सुरु आहे. विजेबरोबरच तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील गेली ३ वर्षे १५ डिसेंबरपूर्वी खड्डे मुजवणार असल्याची घोषणा करतात. स्वत:ला शेतकरी नेते म्हणवून घेणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शासनात बसून भूलथापा मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने नोटाबंदीतून सामान्य जनतेला कंगाल केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस विरोधात असताना टाळ वाजवून शेतकºयांसाठी आंदोलन करत राज्यभर फिरत होते. आता सत्तेत आल्यावर त्यांना शेतकºयांचा विसर पडला आहे.माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, ‘मी लाभार्थी’ जाहिरातीतून शासनाची लबाडबाजी सुरु आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने अनेक योजना राबविल्या; मात्र त्याची जाहिरातबाजी केली नाही. शेतकºयांच्य कर्जमाफीला ४ महिने झाले. दिवाळी गेली तरी अजून १ पैसाही जमा झालेला नाही.आष्टा शहराध्यक्ष अनिल पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिव हुलवान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, कार्तिक पाटील, क्रांतिप्रसाद पाटील, उदय शिंदे, गुरुराज माने, विशाल पवार, उमेश पवार, अमोल गुरव, विशाल सूर्यवंशी, मनोज पाटील, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप