शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी गॅस विरोधात शुक्रवारी आंदोलन

By admin | Updated: December 14, 2014 23:49 IST

अंजनवेल फाटा ते कंपनी गेटपर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन

गुहागर : रत्नागिरी गॅस प्रकल्पाचे व युपीएल कंपनीचे अधिकारी यांनी प्रकल्पात कामगार भरती करताना न्यायालयीन मार्गदर्शकांच्या सूचनांना व निर्णयांना धाब्यावर बसवून कामगारांचे शोषण केले आहे. याबाबत शुक्रवारी १९ डिसेंबरला अंजनवेल फाटा ते कंपनी गेटपर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत बाईत यांनी दिली.पूर्वाश्रमीचा एन्रॉन दाभोळ वीज प्रकल्प आणि सध्याच्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात कामगार भरती करताना ती कशा प्रकारे व्हावी, याबाबत मुुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अंमलबजावणी न करता अधिकारी व कंत्राटदारांचा मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप बाईत यांनी केला आहे.यशवंत बाईत यांनी कामगारांच्या न्याय हक्कांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. कंपनीच्या युपीएल या उपठेकेदारांकडून मनमानी कारभार चालू आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये स्थान नाही व जे कामावर आहेत त्यांचे आर्थिक व अन्य प्रकारे शोषण सुरु आहे. युपीएल कंपनी म्हणजे राजकीय ठेकेदारांचा अड्डा बनला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. यासाठी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. प्रकल्पग्रस्त कामगारांना शासनाच्या आदेशानुसार पगार दिला जात नाही. यावर यशवंत बाईत यांनी कंपनीचे निवासी प्रबंधक यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, याकडे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. अखेर कामगारांनी आपले न्याय हक्क मिळविण्यासाठी १९ डिसेंबरला कंपनी गेटसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्याला आला आहे. (प्रतिनिधी)