शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीप्रमाणे ऊस बिल न देता फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

मिरज परिसरातील महादेव कोरे यांच्यासह पाच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या ...

मिरज परिसरातील महादेव कोरे यांच्यासह पाच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया प्रा. लि. यांना शेतकऱ्यांनी चालू गळीत हंगामात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ऊस गाळपास पाठविला आहे. ऊस गाळपास आल्यानंतर एफआरपीप्रमाणे ऊस बिल १४ दिवसांचे आत देणे बंधनकारक आहे. मात्र, एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी कारखान्याकडून गाळप झालेल्या ऊसबिलाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. कारखाना चालकांनी जाणूनबुजून वैधानिक आधारभूत किमतीप्रमाणे ऊसबिलाप्रमाणे रक्कम न देता कायद्याचा अवमान व शेतकऱ्यांची फसवणूक व विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मिलिंद खाडिलकर, गोपाळ खाडिलकर, मकरंद खाडिलकर, महादेव कोरे, सचिन कोरे (रा. मिरज) यांनी दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू, प्रिया रूपारेल, मुख्य कार्यकारी अधिकारी मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापकीय संचालक शरद मोरे (सर्व रा. सांगली) यांच्याविरुद्ध सांगलीतील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्याविरुद्ध फसवणूकप्रकरणी न्यायालयात फाैजदारी खटला दाखल केला आहे.